गोवा – २ सप्टेंबरला रात्री ११.५७ मिनिटांपासून सनातन संस्थेची फेसबूकची अधिकृत ‘सनातन संस्था’, ‘सनातन संस्था इंग्रजी’, सनातन संस्थेचे ‘प्रोफाईल पेज’ आणि ‘सनातन संस्था बेळगाव’ अशी एकूण ४ पाने अचानक दिसणे बंद झाले आहे. या फेसबूक पानांवरून नियमित धर्मशास्त्र, अध्यात्म, साधना आदि विषयांविषयी पोस्ट करण्यात येत होत्या. तसेच कोरोना महामारीच्या काळात दर्शकांना आधार देणारे आणि साधना शिकवणारे ‘ऑनलाईन सत्संगां’चे देखील नियमित प्रक्षेपण करण्यात येत होते. ही फेसबूक पाने बंद होण्यामागील कारण अद्याप कळू शकले नाही.
दर्शकांना निवेदन
‘ऑनलाईन सत्संगां’चे प्रक्षेपण सनातन संस्थेचे फेसबूक पान बंद असेपर्यंत Youtube.com/SanatanSanstha1 या सनातन संस्थेच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनलवर दर्शक पाहू शकतात. तसेच नियमित पोस्ट केल्या जाणार्या विषयांचे नोटीफिकेशन मिळवण्यासाठी सनातन संस्थेचे खालील अॅप डाऊनलोड करा.
|
अँड्रॉइडसाठी : https://www.sanatan.org/android आयओएससाठी : https://www.sanatan.org/ios |



श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !