फोंडा (गोवा) – जिज्ञासूंना परिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणार्या सनातन संस्थेच्या नव्या स्वरूपातील ‘अँड्रॉइड अॅप’चे ३० ऑगस्ट या दिवशी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या हस्ते ‘ऑनलाईन सत्संगा’त लोकार्पण करण्यात आले. याआधीच्या अॅपपेक्षा हे अॅप नवीन स्वरूपात वैशिष्ट्यांसह उपलब्ध झाले आहे. हिंदी, मराठी, इंग्रजी, कन्नड, गुजराती, तेलुगु, तमिळ, मल्ल्याळम् आणि नेपाळी या ९ भाषांमधील वाचक याचा लाभ घेऊ शकतात. एकदा वाचलेला मजकूर नंतर ‘ऑफलाइन’ (इंटरनेटच्या वापराशिवाय) वाचता येण्याची सुविधा यात समाविष्ट आहे.

सण-व्रते, अध्यात्म, धर्मशिक्षण, हिंदु धर्म, आयुर्वेद आदी विषयांवरील अमूल्य असे ज्ञान या अॅपमध्ये असलेल्या लेखांतून वाचकांना उपलब्ध असेल. त्याचप्रमाणे ‘आपत्काळाला तोंड देण्यासाठी करावयाचे प्रयत्न’ या विषयावर स्वतंत्र अशी लेखमाला या अॅपवर वाचकांना वाचायला मिळेल. हे अॅप PlayStore वर निःशुल्क उपलब्ध आहे. वाचकांनी हे अॅप आपल्या भ्रमणभाषमध्ये डाऊनलोड करून यातील अमूल्य ज्ञानाचा लाभ करून घ्यावा, तसेच आपले परिचित, नातेवाईक यांनाही डाऊनलोड करायला सांगावे, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
हे अॅप डाऊनलोड करण्यासाठी लिंक – https://www.sanatan.org/android
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !