सनातन संस्थेच्या विविध भाषांतील पंचांग ‘अॅप्स’ना अभूतपूर्व प्रतिसाद
‘सनातन संस्थेच्या वतीने प्रतीवर्षी वार्षिक ‘सनातन पंचांग’ (दिनदर्शिका) प्रसिद्ध केले जाते. अल्पावधीतच हे पंचांग लोकप्रिय झाले आहे. हे पंचांग म्हणजे साधना आणि धर्मशिक्षणविषयक लिखाण यांनी परिपूर्ण आहे. ‘पंचांगच नव्हे, तर हिंदुत्वाचे सर्वांग !’ असे याचे घोषवाक्य आहे. ‘सनातन पंचांगा’चे अॅप मराठी, हिंदी, कन्नड, गुजराती, तेलुगु, इंग्रजी आणि तमिळ या भाषांमध्ये ‘अॅन्ड्रॉईड’ आणि ‘आयओएस्’ या ‘अॅप प्लॅटफॉर्म्स’वर उपलब्ध आहे.
वैशिष्ट्यपूर्ण सूत्र म्हणजे कन्नड आणि हिंदी सनातन पंचांग अॅप प्रत्येकी १० लाखांहून अधिक जणांनी ‘डाऊनलोड’ केले आहे. तेलुगु आणि मराठी सनातन पंचांगाचे अॅप ५ लाखांहून अधिक, तमिळ आणि गुजराती सनातन पंचांगाचे अॅप १ लाखाहून अधिक जणांनी ‘डाऊनलोड’ केले आहे. आराध्यदेवतांची सात्त्विक चित्रे, धर्मशिक्षण आणि साधनेविषयी मार्गदर्शन, तसेच राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणार्थ दिशादर्शन ही सनातनच्या पंचांगाची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. पंचांगाच्या अॅपला मिळालेला हा प्रतिसादच त्याच्या लोकप्रियतेची पावती आहे.

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
sanatan panchang 2023 kaha se download kre hindi me
नमस्कार श्री. जितेंद्रसिंह राजपुरोहितजी,
हमें संपर्क करने के लिए धन्यवाद । कृपया सनातन पंचांग का एप नीचे दिए लिंक्स से डाऊनलोड कर सकते हे ।
१. Android App – https://play.google.com/store/apps/details?id=sanatan.hindi.panchang
२. iOS App – https://apps.apple.com/in/app/hindi-panchang-2020/id1188236349