फोंडा (गोवा) – भाविकांना श्री गणेशमूर्तीची स्थापना करणे सुलभ व्हावे, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ‘गणेश पूजा आणि आरती’ या अँड्रॉइड अॅपची निर्मिती करण्यात आली. यामध्ये पूजाविधीसाठी लागणारे साहित्य, पूजेसाठी करावयाची सिद्धता, नैवेद्य या माहितीसह षोडशोपचार पूजाविधीचा ‘ऑडिओ’ही उपलब्ध आहे. मराठी, हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या ४ भाषांमध्ये उपलब्ध असणारे हे अँड्रॉइड अॅप आजतागायत १ लाखाहून अधिक वेळा डाऊनलोड झाले आहे. त्यामुळे गणेशभक्तांना हे अॅप आवडल्याची जणू पावतीच मिळाली आहे. कोरोना महामारीमुळे दळणवळण बंदी असल्याने पुरोहितांच्या अनुपस्थितीत श्री गणेशमूर्तीची स्थापना करणे भाविकांना सुलभ झाल्याचे दिसून आले.
‘आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ?’ याचबरोबर श्री गणेशाची तीर्थक्षेत्रे, श्री अष्टविनायकांचा इतिहास आणि पौराणिक कथा यांचाही या अॅपमध्ये समावेश करण्यात आला आहे. श्री गणेशमूर्तीच्या वैज्ञानिक चाचणीच्या मोजमापाचे अद्वितीय असे संशोधनही या अॅपमध्ये वाचायला मिळते. सर्वप्रथम ऑगस्ट २०१८ मध्ये हे अॅप भाविकांसाठी उपलब्ध झाले होते.

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !