‘ऑनलाईन’ ‘अखिल भारतील हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या चौथ्या दिवशीचे सत्र

नवम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त ‘हिंदु राष्ट्र’विषयक मान्यवरांची भाषणे !

‘देहली दंगल’ आणि ‘शाहीनबाग आंदोलन’ हे शहरी नक्षलवादी व जिहादी यांचे देशविरोधी षड्यंत्रच !
– कपिल मिश्रा, माजी आमदार, भाजप, देहली

भारतीय संसदेपासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर हिंसक आंदोलन करत भारतात ‘इस्लामी शासन’ लागू करण्यासाठी भडकाऊ भाषणे दिली गेली. विदेशी निधीच्या बळावर अनेक पोलिसांना लक्ष्य करण्यात आले, तर अनेक हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या, ‘सीएन्जी’च्या अनेक बसगाड्या जाळून त्याद्वारे स्फोट घडवण्याचे मोठे नियोजन करण्यात आले होते. या दंगलखोरांना समर्थन देण्याचे काम देशातील पुरोमागी आणि डाव्या विचारांचे पत्रकार, प्रसिद्धीमाध्यमे, अधिवक्ता, लेखक, विचारवंत आदींनी केले. देहली दंगल आणि शाहीनबाग आंदोलन हे शहरी नक्षलवादी अन् जिहादी यांनी भारतात अराजक माजवण्यासाठी नियोजनपूर्वक घडवून आणलेले मोठे देशविरोधी षड्यंत्र होते, जे आता ‘आम आदमी पार्टी’चे नगरसेवक ताहीर हुसेनने देहली दंगलीतील स्वतःच्या सहभागाची स्वीकृती दिल्याने स्पष्ट झाले आहे, असा घणाघात देहलीचे माजी आमदार कपिल मिश्रा यांनी केला. ते नवम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’मध्ये बोलत होते.

हे ‘ऑनलाइन’ अधिवेशन हिंदु जनजागृती समितीच्या ‘यू-ट्यूब’ चॅनल आणि ‘हिंदु अधिवेशन’ या ‘फेसबूक पेज’द्वारे लाइव्ह प्रसारित होत असून 56 हजारांहून अधिक लोकांनी ते प्रत्यक्ष पाहिले, तर 2 लाखांहून अधिक लोकांपर्यंत हा विषय पोचला. या वेळी मुंबई येथील ‘लष्कर-ए-हिंद’चे संस्थापक अध्यक्ष श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल यांनी ‘अर्बन नक्षलवाद : समस्या आणि उपाय’ या विषयावर बोलतांना शहरी नक्षलवाद्यांचे पितळ उघडे पाडत हिंदूंना संघटितपणे प्रतिकार करण्याचे आवाहन केले, तर हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी ‘हिंदु राष्ट्राचा प्रसार करण्यासाठी चालवले जाणारे उपक्रम’ या विषयावर बोलतांना हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कसा प्रसार करावा, याबद्दल प्रभावी मार्गदर्शन केलेे.

१. देहली दंगल हा शहरी नक्षलवादी आणि जिहादी आतंकवादी यांनी भारतात अराजक माजवण्‍यासाठी केलेला प्राथमिक प्रयोग !

२. आतंकवाद्यांची तळी उचलत हिंदूंच्‍या व्‍यथांकडे दुर्लक्ष करणारे दुटप्‍पी पत्रकार पत्रकारितेकला कलंक !

३. अधिवेशनाच्‍या माध्‍यमातून हिंदूंना जोडून ठेवण्‍याचे आणि विचारांचे आदानप्रदान करण्‍याचे सनातन संस्‍था आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्य कौतुकास्‍पद !

कोरोना महामारीच्‍या काळातही ‘अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशना’च्‍या माध्‍यमातून हिंदूंना जोडून ठेवण्‍याचे आणि विचारांचे आदानप्रदान करण्‍याचे जे कार्य सनातन संस्‍था आणि हिंदु जनजागृती समिती करत आहेत, ते खरेच कौतुकास्‍पद आहे. या अधिवेशनाचे सुंदर पद्धतीने आयोजन करणार्‍या आयोजकांना अनेक शुभेच्‍छा !

मानवाधिकाराचे ठेकेदार आतंकवादी आणि नक्षलवादी यांना प्राणवायू पुरवण्‍याचे काम करतात ! – ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल, संस्‍थापक अध्‍यक्ष, ‘लष्‍कर-ए-हिंद’, मुंबई

मानवाधिकार संघटनेमध्‍ये कार्य करणारे अनेक लोक हे नक्षलवादी विचारसरणीचे आहेत. ते आतंकवादी आणि नक्षलवादी यांना प्राणवायू पुरवण्‍याचे काम करतात. एखाद्या घटनेत आतंकवादी किंवा नक्षलवादी यांना अटक झाली की, ते लगेच मानवाधिकाराची गळचेपी होत असल्‍याच्‍या तक्रारी नोंदवतात. न्‍याययंत्रणेमध्‍ये असणारे त्‍यांच्‍या बाजूचे साम्‍यवादी लोक लगेच अशा प्रकरणांची सुनावणी करून आतंकवादी आणि नक्षलवादी यांना वाचवण्‍याचे कार्य करतात. न्‍याययंत्रणा, प्रसारमाध्‍यमे, सामाजिक संस्‍था आदी क्षेत्रांत साम्‍यवादी, धर्मांध मुसलमान आणि ख्रिस्‍ती नियोजनबद्ध रितीने भारतीय संस्‍कृती उद़्‍ध्‍वस्‍त करण्‍याचे षड्‍यंत्र पूर्ण होण्‍यासाठी कार्यरत आहेत. याच्‍या विरोधात लढण्‍यासाठी हिंदूंनी जागृत झाले पाहिजे. नक्षलवादी विचारसरणीच्‍या संस्‍थांवर लक्ष ठेवायला हवे. देशविरोधी कारवाया करणार्‍या संघटनांवर कारवाई होण्‍यासाठी शासन-प्रशासन यांना पत्र पाठवून, निवेदने देऊन पाठपुरावा घ्‍यायला हवा. आपल्‍या देशाला आपली आज आवश्‍यकता आहे. राष्‍ट्ररक्षणासाठी जागृत होणे, हे आपले कर्तव्‍य आहे.

देशद्रोही संघटनांवर कारवाई करण्‍याची मागणी करणार्‍या संस्‍थेचीच चौकशी !

‘मी ‘पॉप्‍युलर फ्रंट ऑफ इंडिया’, तसेच अन्‍य जिहादी संघटना यांच्‍या देशद्रोही कारवायांची माहिती देत या संघटनांवर कारवाई करण्‍याची मागणी करण्‍याचे पत्र पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना पाठवले होते; पण त्‍या संघटनांवर कारवाई होण्‍याऐवजी माझीच संस्‍था नोंदणीकृत आहे कि नाही, अशी प्रशासनाने चौकशी केली. प्रशासनामध्‍ये साम्‍यवाद्यांचा किती पगडा आहे, हे लक्षात येते’, असे श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल यांनी सांगितले.

क्षणचित्र

‘भारत हिंदु राष्‍ट्राच्‍या दिशेने वाटचाल करत आहे. गुरुजींनी (सनातन संस्‍थेचे संस्‍थापक परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी) भविष्‍यवाणी केल्‍याप्रमाणे वर्ष २०२३ मध्‍ये हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना होणार आहे’, असा विश्‍वास व्‍याख्‍यानाच्‍या आरंभी श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल यांनी व्‍यक्‍त केला.

 

नवम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त ‘हिंदु राष्ट्र’विषयक परिसंवाद !

प्रत्येक अधिवक्त्याने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात पायाभरणीचा दगड बनणे आवश्यक !
– अधिवक्ता विष्णु शंकर जैन, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस, देहली

अधिवक्ता विष्णु शंकर जैन

फोंडा – एकीकडे ‘देश ‘धर्मनिरपेक्ष’ आहे’, असे म्हणायचे आणि दुसरीकडे कलम २९ आणि ३० नुसार अल्पसंख्यांकांच्या पुनरुत्थानासाठी वेगवेगळ्या योजना राबावायच्या. ही कसली धर्मनिरपेक्षता ? केंद्र सरकार केवळ मुसलमानांसाठी ५ सहस्र कोटी रुपये खर्च करत आहे. हे कलम २९ आणि ३० चे उल्लंघन नाही का ? कारण ‘अल्पसंख्यांक’ मध्ये जैन, शीख, पारशी हेदेखील येतात. त्यांचे काय ? राज्यघटनेची मूळ संकल्पना न पालटता घटनेत पालट करता येतात. प्रत्येक अधिवक्त्याने हिंदु राष्ट्र स्थापनेच्या या कार्यात पायाभरणीचा दगड बनायला हवे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयात हिंदु महासभेच्या बाजूने राममंदिराची बाजू मांडणारे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ नवम अखिल भारतीय हिंदु अधिवेशनाच्या चौथ्या दिवसाच्या द्वितीय सत्रात ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता आणि दिशा’ या विषयावर ‘ऑनलाइन’ परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी वरील विचार मांडले.

ते पुढे म्हणाले

१. तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी घटनेच्या प्रस्तावनेत घुसडलेले ‘धर्मनिरपेक्षता’ आणि ‘समाजवाद’ हे दोन्ही शब्द अनावश्यक असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायाधिशांनी वर्ष २०१५ मध्ये मद्रास बार असोसिएशनच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात व्यक्त केले होते.

२. राजकीय पक्षाची स्थापना करतांना त्या पक्षाच्या संबंधित पक्षप्रमुखाला ‘आम्ही ‘समाजवाद’ आणि ‘धर्मनिरपेक्षता’ या तत्त्वांची कार्यवाही करू’ असे घोषणापत्र सादर करावे लागते. असे असतांना ‘ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुसलमीन’ (AIMIM) या पक्षाच्या संविधानात मात्र ‘पक्ष केवळ मुसलमानांच्या हितासाठी काम करेल’, असा स्पष्ट उल्लेख आहे.

३. ‘देश गुलामीच्या छायेतून मुक्त झाल्यानंतर सर्वप्रथम गुलामीची चिन्हे मिटवायला हवीत’, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या ‘आंबेडकर थॉट्स ऑन पाकिस्तान’ या ग्रंथात लिहले आहे.

४. जी मंदिरे तोडली गेली आहेत, त्याचे पुनरुत्थान करणे, हा घटनात्मक अधिकार आहे.

 

‘धर्मनिरपेक्ष’ देशात हिंदूंना वेगळा आणि अन्‍य धर्मियांना वेगळा न्‍याय का ? – श्री. विकास सारस्‍वत, लेखक, आगरा, उत्तरप्रदेश

१. ख्रिस्‍ती आणि मुसलमान त्‍यांच्‍या शाळांमध्‍ये धार्मिक शिक्षण देतात; मात्र हिंदूंना हिंदूंच्‍या शाळेत धर्मशिक्षण देता येत नाही; कारण देश धर्मनिरपेक्ष आहे.

२. हिंदूंच्‍या मंदिरांचे सरकारीकरण करून केवळ मंदिरे कह्यात घ्‍यायची. मशिदी, चर्च यांचे काय ?

३. देश जर धर्मनिरपेक्ष आहे तर मग हिंदूंना वेगळा न्‍याय आणि अन्‍य धर्मियांना वेगळा न्‍याय कसा काय ?

४. अखलाखच्‍या हत्‍येनंतर जेवढी चर्चा होते, तेवढी हिंदुत्‍वनिष्‍ठ चंदन गुप्‍ता आणि प्रशांत पुजारी यांच्‍या हत्‍येनंतर होतांना दिसत नाही.

 

छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापनेत
साहाय्य करणार्‍या मावळ्यांप्रमाणे धर्माचरण आणि त्यागी
होणे आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे

१. घटनेच्या प्रस्तावनेत न्याय आणि समानता या तत्त्यांचा उल्लेख आहे. असे असतांना भारत सरकार मुसलमानांना हज यात्रेला जाण्यासाठी अनुदान देते, आंध्रप्रदेश सरकार ख्रिस्त्यांना जेरुसलेमला जाण्यासाठी अनुदान देते; मात्र तीर्थयात्रेला जाण्यासाठी हिंदूंना देशातील कोणतेही राज्य सरकार अनुदान देत नाही.

२. मशीद, चर्च यांचे नाही, तर केवळ हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण केले जाते. हा सरळसरळ भेदभाव आहे. असली ढोंगी धर्मनिरपेक्षता काय कामाची ?

३. वेब सिरीजच्या माध्यमातून सर्रासपणे हिंदु धर्म, हिंदूंच्या देवता यांचे विडंबन केले जात आहे. याउलट ‘महंमद : द मेसेंजर ऑफ गॉड’ या चित्रपटाच्या प्रसारणाला मुंबई येथील दंगलीचा आरोप असणार्‍या ‘रझा अकादमी’ या संघटनेने विरोध दर्शवल्यावर महाराष्ट्र सरकार या चित्रपटावर बंदी आणते.

४. एकूणच काय तर देशात गोरक्षण, धर्मांतरण, लव्ह जिहाद, मंदिर सरकारीकरण यांसारख्या अनेक समस्या आहेत; मात्र या सर्व समस्यांवर एकमेव उपाय आहे आणि तो म्हणजे ‘हिंदु राष्ट्र’ !

५. संतांच्या वचनानुसार वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र येणारच आहे. त्यासाठी आवश्यकता आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापनेत साहाय्य करणार्‍या मावळ्यांप्रमाणे धर्माचरण आणि त्यागी वृत्तीची !

 

हिंदूंमध्ये जागृती निर्माण करणार्‍या हिंदु जनजागृती समितीच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रसारक, हिंदु जनजागृती समिती

Leave a Comment