आपल्या संकेतस्थळावर सनातन संस्थेप्रमाणे लेख (मजकूर) प्रकाशित करून व्यावसायिक हेतू साध्य करू पहाणार्‍या व्यक्तींपासून सावध रहावे !

‘पूर्वी सनातन संस्थेच्या संपर्कात असलेल्या एका व्यक्तीने ‘ऑनलाईन पोर्टल’ (संकेतस्थळ) चालू केले आहे. त्या ‘पोर्टल’मध्ये तणाव मुक्तीविषयी लेख लिहिण्याची संकल्पना, तसेच अन्य काही मजकूर सनातन संस्थेच्या लिखाणाप्रमाणेच आहे. ही व्यक्ती समाजातील काही ‘व्हॉट्सअ‍ॅप’ गटांत सदर लेख, तसेच आपल्या व्यवसायाशी निगडित ‘पोस्ट’ नियमित पाठवत असते. त्यामुळे ‘ती सनातन संस्थेशी संबंधित आहे’, अशी समाजाची दिशाभूल होण्याची शक्यता आहे.

‘सदर व्यक्तीचा सनातन संस्थेशी कोणताही संबंध नाही’, याची वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांनी नोंद घ्यावी. अशा प्रकारे सनातन संस्थेशी साधर्म्य असलेला मजकूर पाठवून आपला व्यावसायिक हेतू साध्य करू पहाणार्‍या व्यक्तीपासून सावध रहावे, ही नम्र विनंती !’

– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्‍वस्त, सनातन संस्था. (२६.७.२०२०)

Leave a Comment