- शिक्षकांसाठी ‘ऑनलाईन’ साधना शिबिराचे आयोजन
- आदर्श शिक्षक बनवण्यासाठी प्रयत्न करणारी सनातन संस्था !
कोल्हापूर – शिक्षक मुलांच्या जीवनात गुरु असतात आणि ते विद्यार्थ्याला योग्य दिशा अन् मार्गदर्शन करतात. पालकांच्या शब्दांपेक्षा शिक्षकांचे शब्द विद्यार्थ्यांसाठी बहुमूल्य असतात. विद्यार्थ्यांना येत असलेला अभ्यासाचा अथवा परीक्षेचा ताण केवळ साधनेनेच अल्प होऊ शकतो, ही अनुभूती अनेक साधक शिक्षकांनी घेतली आणि आताही घेत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन करून त्यांच्यात मोठ्या प्रमाणात पालट घडवणे शक्य आहे. यांद्वारे त्यांना प्रामाणिक आणि सुजाण नागरिक सिद्ध करता येईल, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. नुकतेच सनातन संस्थेच्या वतीने संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या मार्गदर्शन करत होत्या.
या शिबिरासाठी सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, तसेच गोवा राज्यातील असे एकूण १२५ शिक्षक सहभागी झाले होते. शिबिराचा उद्देश सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी सांगितला. शिबिरात काही शिक्षक साधकांनी त्यांचे मनोगत, तर काहींनी शिबिरात काय शिकायला मिळाले, याविषयी सांगितले.

धारुहेरा (हरियाणा) येथे सनातन संस्थेचे ‘संस्कृती संवर्धन प्रशिक्षण शिबिर’ पार पडले !
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !
चिपळूण-पाग येथील श्री सुकाईदेवी मंदिरात सनातन संस्था आयोजित संस्कार प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आध्यात्मिक साधनाच व्यक्तीला तणावमुक्त करू शकते ! – रणजित प्रसाद, सनातन संस्था
सांगली येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचनाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !