मनोविकारतज्ञांनो, डॉक्टरांनो आणि वैद्यांनो मनोरुग्णांना आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी त्यांच्याकडून तुम्ही करून घ्यावयाची सिद्धता

मनोविकारतज्ञांनो, डॉक्टरांनो आणि वैद्यांनो मनोरुग्णांना आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी त्यांच्याकडून तुम्ही करून घ्यावयाची सिद्धता, म्हणजे मनोरुग्णांना स्वयंसूचना उपचारपद्धत आणि नामजप करण्यास शिकवणे अन् मनोरुग्णांनीही यासाठी मनापासून प्रयत्न करणे !

बहुतेक सर्व मध्यम आणि तीव्र मनोविकार हे तीव्र स्वभावदोष, तीव्र प्रारब्ध आणि वाईट शक्तींचा त्रास या तीन कारणांमुळे होतात. आपत्काळात काळजी कमी करणार्‍या, निराशा कमी करणार्‍या, झोप आणणार्‍या इत्यादी विविध प्रकारच्या गोळ्या उपलब्ध नसतील. तीव्र स्वभावदोष, तीव्र प्रारब्ध आणि वाईट शक्तींचा त्रास या तीन कारणांवर पुढील ३ उपचारपद्धती रुग्णांना आतापासून शिकवल्यास त्यांना आपत्काळात मनोविकार सुसह्य होतील किंवा ते बरेही होतील.

१. स्वभावदोष निर्मूलनासाठी स्वयंसूचना उपचार पद्धत : मनोविकारतज्ञांनी आतापासूनच ही पद्धत शिकून रुग्णांना शिकवावी.

२. प्रारब्ध : प्रारब्ध अल्प करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे साधना. सर्वांत महत्त्वाची साधना म्हणजे कुलदेव किंवा कुलदेवी यांचा प्रतिदिन १ घंटा जप करणे’

३.  वाईट शक्तींचा त्रास : हा त्रास अल्प करण्यासाठी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा जप प्रतिदिन २ घंटे जप करणे

वरील दोन्ही जप जितके एकाग्रतेने आणि भावपूर्ण होतील, तितका त्यांचा लाभ लवकर होतो. सर्वसाधारण व्यक्तीलाही जप एकाग्रतेने आणि भावपूर्ण करणे अशक्य असते. मनोरुग्णांना तर हे फारच अशक्य असते; म्हणून त्यांनी जप केवळ १ – २ घंटे न करता दिवसाचा अधिकाधिक वेळ करावा, म्हणजे त्यांना ५ – ६ मासांत फरक जाणवू लागेल.

ज्यांना या उपचारपद्धती स्वतःला शिकायच्या असतील, त्यांनी पुढील पत्त्यावर संपर्क साधावा.

सौ. भाग्यश्री सावंत

भ्रमणभाष क्रमांक : ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन ४०३४०१

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment