श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी २८ वर्षानंतर घेतले रामललाचे दर्शन !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्रीराम जन्मभूमीवरील राममंदिराचे बांधकाम चालू झाले आहे, अशी घोषणा श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपाल दास यांनी २८ वर्षांनंतर श्रीराम जन्मभूमीवरील रामलला यांचे दर्शन घेतल्यानंतर केली.
श्री रामललाचे दर्शन घेतल्यानंतर महंत नृत्य गोपाल दास म्हणाले की, आज अत्यंत पवित्र दिवस आहे. श्री रामललाच्या दर्शनासाठी आम्ही आलो आहोत. आमचे चांगल्या प्रकारे दर्शन झाले आहे. मंदिरासाठीच्या शिळा सिद्ध झालेल्या आहेत. मंदिराचे बांधकाम चालू झाले आहे. बांधकामासाठीची यंत्रे येतील आणि मंदिर बनत जाईल. आम्ही आजपासूनच मंदिराचे काम चालू केले आहे.

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !