यावरून लावला जातो मान्सूनचा अंदाज
याविषयी अंनिसवाल्यांना काय म्हणायचे आहे !
कानपूर (उत्तरप्रदेश) – येथील बेहटा बुजूर्ग गावामध्ये भगवान श्री जगन्नाथाचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरात मान्सूनची भविष्यवाणी होते. अनुमाने १ सहस्र वर्षे जुने असलेल्या या मंदिराची बांधणी अशी आहे की, पाऊस चालू होण्याच्या ५-७ दिवस आधी मंदिराच्या गर्भागृहाच्या छतातून पाण्याचे थेंब पडायला लागतात. यावरून मान्सूनचा अंदाज लावला जातो. यावर संशोधनही झाले आहे.
याविषयी मंदिराचे पुजारी के.पी. शुक्ला यांनी सांगितले की, या मंदिराच्या छतावर मान्सूनची स्थिती दर्शवणारा एक दगड बसवलेला आहे. या दगडातून पडणार्या पाण्याच्या थेंबांपासून पाऊस कसा होईल, याचा अंदाज बांधता येतो. जर जास्त थेंब पडले, तर अधिक पाऊस होण्याची शक्यता असते.
लक्ष्मणपुरी येथील भारतीय पुरातत्व खात्याचे वरिष्ठ अधिकारी मनोज वर्मा यांनी सांगितले की, या मंदिराच्या भिंती आणि छत चुना-दगड यांपासून बनवण्यात आले आहे. पावसापूर्वी हवामानातील उष्णता वाढते. त्यामुळे चुना वातावरणातील आर्द्रता शोषून घेतो. ही आर्द्रता दगडामध्ये जाते आणि पाण्याचे थेंब बनून छतातून पडू लागतात. याच कारणाने या मंदिराला ‘मान्सून मंदिर’ असेही म्हटले जाते.

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !