पाने तोडल्यावर झाडे जोरात ओरडतात ! – संशोधकांचा निष्कर्ष

वनस्तपतींमध्येही जीव आहे, हे भारताच्याच जगदीशचंद्र बोस या शास्त्रज्ञांनी सांगितले होते. भारतीय संस्कृतीमध्ये वृक्षांनाही देव म्हटले गेलेले आहे. त्यामुळे त्यांचेही पूजन केले जाते. वैज्ञानिक आता कुठे ‘झाडांनाही संवेदना असतात’, असे सांगू लागले आहे. यातून भारतीय संस्कृती किती महान आहे, हे लक्षात येते !

नवी देहली – झाडांची पाने तोडल्यावर त्यांना वेदना होतात आणि ते ओरडतात, हे एका संशोधनातून समोर आले आहे. तेल अवीव विश्‍वविद्यालयाच्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे. त्यांनी टोमॅटो आणि तंबाखू यांच्या झाडांवर हे संशोधन केले. या संशोधकांच्या संशोधनानुसार पर्यावरण किंवा बाहेरील दबावामुळे झाडे जोरात आवाज करतात. हे तपासण्यासाठी त्यांनी १० मीटर दूरवर ‘मायक्रोफोन्स’ ठेवले होते. यात झाडांच्या हालचाली नोंदवण्यात आल्या. त्यातून असे समोर आले की, ज्या झाडांवर दबाव पडतो, म्हणजे जी झाडे ओढली जातात किंवा त्यांची पाने तोडली जातात ती झाडे २० ते १०० किलोहर्टज ‘अल्ट्रासॉनिक फ्रिक्वेन्सी’ उत्सर्जन करतात. तसेच जेव्हा झाडांची पाने तोडली जातात तेव्हा ती झाडे इतर झाडांनाही त्यांच्या वेदना सांगण्याचा प्रयत्न करतात. अभ्यासकांनी ३५ छोटी छोटी यंत्रे लावली होती. त्याद्वारे झाडांवर लक्ष ठेवले गेले. त्यांच्या बारीक हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले.

जेव्हा टोमॅटो आणि तंबाखू यांच्या झाडांना अनेक दिवस पाण्यापासून दूर ठेवण्यात आले, तेव्हा त्यांनी ३५ अल्ट्रासॉनिक डिस्ट्रेस साउंड निर्माण केला.

म्हणजे झाडांना पाणी दिले नाही, तर त्यांना तणाव येतो. (भलेही मनुष्यांना झाडांचा आवाज ऐकू येत नाही; मात्र वातावरणातील पालटामुळे (प्रदूषणामुळे) झाडे कधीपासून ओरडत आहेत, हे जाणून मनुष्याने निसर्गाच्या रक्षणासाठी प्रयत्न केले पाहिजेत ! – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment