राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची उपस्थिती
अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये असा पाठ केला जाऊ शकतो; मात्र भारताच्या संसदेत तो केला जाऊ शकत नाही; कारण भारत एक ‘धर्मनिरपेक्ष’ देश आहे !
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेमध्ये राष्ट्रीय सेवा दिनाच्या निमित्ताने सर्वांचे आरोग्य, संरक्षण आणि कल्याण व्हावे यांसाठी राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असणार्या व्हाईट हाऊसमध्ये एका प्रार्थनासभेचे आयोजन करण्यात आले. येथील ‘रोज गार्डन’मध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आमंत्रणावरून न्यूजर्सी येथील बी.ए.पी.एस्. स्वामीनारायण मंदिराचे पुजारी हरीश ब्रह्मभट्ट यांनी वैदिक शांतीपाठ केला. तसेच नंतर त्यांनी याचे भाषांतर इंग्रजीमध्ये उपस्थितांना सांगितले. या वेळी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प हे उपस्थित होते.
१. ब्रह्मभट्ट यांनी केलेल्या प्रार्थनेमध्ये म्हटले, ‘‘शांतीसाठी केलेल्या प्रार्थनेचा आवाज स्वर्गापर्यंत जात आहे. आकाश आणि पृथ्वी यांमध्ये शांती निर्माण व्हावी, पाण्यामध्ये, वनस्पतींमध्ये, शेतामध्ये सर्वत्र शांती निर्माण व्हावी. ओम शांती, शांती, शांती.’’
२. हरीश ब्रह्मभट्ट म्हणाले की, शांतीपाठ एक अशी प्रार्थना आहे जी धन, संपत्ती, प्रसिद्धी, यश आदी स्वर्गासारख्या गोष्टींच्या कामनेसाठी केली जात नाही. ही शांततेसाठी करण्यात येणारी एक सुंदर हिंदु प्रार्थना आहे. ही एक वैदिक प्रार्थना आहे. याचे वर्णन यजुर्वेदामध्ये आहे.
३. प्रार्थनेनंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हरीश ब्रह्मभट्ट यांचे आभार मानले. ट्रम्प म्हणाले की, सध्याच्या स्थितीत अमेरिका एक मोठ्या भयानक आजाराशी युद्ध लढत आहेत. जेव्हा संकट किंवा आव्हान उभे ठाकते, तेव्हा आपण श्रद्धेवर विश्वास ठेवतो. प्रार्थनेची शक्ती आणि देवाची अनंत महिमा यांवर विश्वास ठेवला जातो. मी सर्व अमेरिकी नागरिकांना आग्रह करतो की, त्यांनी हृदयापासून प्रार्थना करावी.

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !