इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे नागरिकांना आवाहन
हस्तांदोलन केल्यामुळे शारीरिक स्तरावर संसर्ग होतो, तसाच तो आध्यात्मिक स्तरावरही होतो. हात मिळवल्याने रज-तम या सूक्ष्म गुणांचा, तसेच अनिष्ट शक्तींचा संबंधितांना त्रास होण्याची शक्यता बळावते. यामुळेच हिंदु धर्मात ‘नमस्कार’ करण्यास सांगितला आहे ! कोरोनाच्या प्रभावामुळे का होईना जगालाही नमस्काराचे महत्त्व पटू लागले आहे. पाश्चात्त्यांचे अनुकरण करणारे आतातरी यातून बोध घेतील का ?

जेरूसलेम – ‘कोरोना’ हा साथीचा रोग असल्याने इतरांच्या संपर्कात येताच दुसर्यालाही त्याची लागण होते. यामुळे नागरिकांनी एकमेकांना भेटल्यावर हस्तांदोलन न करता भारतीय पद्धत म्हणजे हात जोडून ‘नमस्ते’ म्हणावे, असे आवाहन इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केले. ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नेतान्याहू यांनी एक आढावा बैठक घेतली. त्या वेळी बैठकीत त्यांनी उपाययोजनांची माहिती देण्यापूर्वी नागरिकांना वरील आवाहन केले. इस्रायलमध्ये आतापर्यंत १५ जणांना कोरोनाची लागण झाली असून अद्यापपर्यंत कुणाचाही मृत्यू झालेला नाही.
या वेळी नेतान्याहू यांनी पत्रकार परिषदेत दोन्ही हात जोडले आणि ‘नमस्ते’ म्हटले. तसेच भारतीय नागरिक इतरांना कसे भेटतात आणि स्वागत करतात, हे नागरिकांना समजावले.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !