
पनवेल – येथील चिंध्रण गावात पेशवेकालीन श्री गणेश मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. माघी श्री गणेश जयंतीच्या निमित्ताने येथे उत्सव साजरा करण्यात आला. या वेळी मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने सनातन संस्थेच्या सौ. नीला गडकरी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच येथे सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. प्रदर्शनाला माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ देशकर, जिल्हा परिषद अध्यक्षा कु. योगिता पारधी, शेकापचे काशीनाथ पाटील आणि शिवसेनेचे कळंबोली शाखाप्रमुख रामदास शेवाळे यांनी भेट दिली. एकनाथ देशकर यांनी प्रदर्शन लावण्यासाठी विशेष सहकार्य केले. प्रदर्शनावर आलेली एक व्यक्ती ‘‘आमच्या गणपति मंदिरात तुमचे प्रदर्शन लावण्यासाठी आम्ही तुमचीच वाट पाहत होतो’’, असे म्हणाली.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !