

शनिशिंगणापूर – भृगु महर्षींच्या आज्ञेने सनातन संस्थेच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी ४ जानेवारी २०२० या दिवशी पहाटे ४ वाजता येथे श्री शनैश्वराला अभिषेक केला. ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील आध्यात्मिक अडथळे दूर व्हावेत, सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांच्यावर आलेला महामृत्यूयोग टळावा आणि सर्व साधकांचे आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत’, असा संकल्प या वेळी करण्यात आला.
श्री शनैश्वर मंदिराचे मुख्य पुजारी श्री. अशोक कुलकर्णी यांनी परात्पर गुरु (डॉ.) आठवले, सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु नंदकुमार जाधव यांचे गोत्र उच्चारण, विधीसाठीचा संकल्प अन् विधीवत मंत्रपठण केले. तद्नंतर संकल्प केलेल्या १५ लिटर तिळाच्या तेलाने सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी मंत्रोच्चारांसहित श्री शनैश्वराच्या मूर्तीवर अभिषेक केला. या वेळी स्थानिक साधक उपस्थित होते.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !