धुळे येथे ‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली

धुळे – धर्मकार्य करायचे असेल, तर साधनेने आध्यात्मिक बळ निर्माण करण्याची आवश्यकता आहे. साधनेचे अनेक मार्ग आहेत. त्यांपैकी ‘गुरुकृपायोग’ हा ईश्वरप्राप्तीसाठीचा विहंगम मार्ग आहे. ‘गुरुकृपा संपादन करण्यासाठी प्रत्येकाने गुरूंना अपेक्षित अशा हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात स्वतःचे योगदान द्यायला हवे’, असे आवाहन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले. ते कार्यशाळेच्या प्रथम उद्बोधन सत्रात ‘आनंदप्राप्तीसाठी साधना’ या विषयावर बोलत होते. हिंदूसंघटन आणि हिंदुत्वनिष्ठांमध्ये कुटुंबभावना निर्माण करणे अशा उद्देशाने येथील ‘श्रीकृष्ण रिसॉर्ट’मध्ये एक दिवसाची ‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा’ घेण्यात आली. या कार्यशाळेस श्रीकृष्ण रिसॉर्टचे मालक श्री. कल्पेश अग्रवाल, तसेच हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट उपस्थित होते.
शंखनाद करून कार्यशाळेला प्रारंभ झाला. वेदमूर्ती श्री. कुणाल देशपांडेगुरुजी यांनी वेदमंत्रपठण केले. सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !