साधकाच्या घरातील भगवान श्रीकृष्ण, प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतिमांना वाहिलेल्या हारांची लांबी दिवसागणिक वाढणे !

ऑक्टोबर २०१८ मध्ये काढलेले देवघराचे छायाचित्र-हारांची लांबी या वेळी अनुक्रमे ११८, १०३ आणि ४८ इंच होती.

डिसेंबर २०१८ मध्ये काढलेले देवघराचे छायाचित्र-हारांची लांबी या वेळी अनुक्रमे १२७, ११० आणि ५३ इंच होती.

आमच्या देवगड येथील घरातील भगवान श्रीकृष्ण, प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतिमांना जुलै २०१८ मध्ये वाहिलेल्या हारांची लांबी दिवसागणिक वाढत आहे. जुलै २०१८ मध्ये हारांची लांबी अनुक्रमे ४८ इंच, २८ इंच आणि १८ इंच होती. ती ३०.४.२०१९ या दिवशी १२८ इंच, ११० इंच आणि ५३ इंच झाली. या ठिकाणी ऑक्टोबर २०१८ आणि डिसेंबर २०१८ मधील हारांची छायाचित्रे दिली आहेत.

– सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment