अप्रचलित आणि विचित्र आडनावांचा व्यक्तींवर होणारा परिणाम अन् आडनावे बदलणे आवश्यक असणे किंवा नसणे याविषयीचे शास्त्र !

‘ताकभाते, विसरभोळे, उकिरडे, ढेंगळे, पिसाट, आपटे, टोंगे, काळे, आस्वले, दोरखंडे, निखाडे, झाडे, डाखोरे, शेर अशी अनेक आडनावे आहेत. त्या आडनावांचा व्यक्तींवर होणारा परिणाम आणि अशी आडनावे बदलणे आवश्यक असणे किंवा नसणे याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

कु. मधुरा भोसले

 

१. सात्त्विक, राजसिक आणि तामसिक शब्दांमधून
अनुक्रमे सात्त्विक, राजसिक आणि तामसिक शक्तीचे प्रक्षेपण होणे

कोणतेेही वाक्य किंवा शब्द यातून ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांच्याशी संबंधित शक्ती अन् चैतन्य’, यांचे वातावरणात प्रक्षेपण होत असते. सात्त्विक शब्दांतून सात्त्विक शक्ती, राजसिक शब्दांतून राजसिक शक्ती आणि तामसिक शब्दांतून तामसिक शक्ती यांचे प्रक्षेपण होत असते.

 

२. संतांच्या नावाचा किंवा आडनावाचा त्यांच्यावर परिणाम न होता,
संतांच्या साधनेचा परिणाम त्यांचे नाव किंवा आडनाव यांच्यावर झालेला आढळणे

६० टक्के पातळीनंतर व्यक्तीच्या आडनावाचा व्यक्तीवर होणारा परिणाम अत्यल्प असतो. ७० टक्के पातळीनंतर व्यक्तीचे नाव किंवा आडनाव हे नाममात्र असते. त्यामुळे व्यक्तीच्या नावाचा किंवा आडनावाचा परिणाम व्यक्तीवर होत नसून व्यक्तीच्या साधनेचा परिणाम तिच्या नावावर आणि आडनावावर झालेला आढळतो, उदा. संत प.पू. ढेकणे महाराज, प.पू. झुरळे महाराज, प.पू. तोतापुरी महाराज, संत मूर्खानंद इत्यादी संतांच्या नावांतून शब्दांच्या अर्थानुसार त्रासदायक स्पंदने न जाणवता चैतन्य आणि आनंदच जाणवतो. संतांच्या साधनेचा परिणाम त्यांच्या नावावर किंवा आडनावावर कशा प्रकारे होतो, याची ही उत्तम उदाहरणे आहेत.

 

३. पातळी आणि साधना यांवर व्यक्तीने तिचे आडनाव बदलण्याची आवश्यकता अवलंबून असणे

व्यक्तीच्या रज-तमात्मक अर्थ असलेल्या आडनावाचा परिणाम तिच्यावर होऊ नये, यासाठी ५० टक्के पातळीपेक्षा न्यून पातळी असणार्‍या आणि साधना न करणार्‍या व्यक्तीने स्वत:चे विचित्र किंवा त्रासदायक आडनाव बदल्यास तिला आध्यात्मिक स्तरावर (सूक्ष्म स्तरावर) अधिक लाभ होतो. ज्या व्यक्तीची पातळी ५० टक्के किंवा त्याहून अधिक आहे किंवा पातळी न्यून असूनही जी व्यक्ती अखंड साधनारत आहे, तिने स्वत:चे नाव किंवा आडनाव पालटण्याची आवश्यकता नसते. उदा. काही जणांचे नाव दगडू, अमावस, भुजंग, दुखिया इत्यादी असतात. आडनावाला लागू झालेली वरील सूत्रे नावालाही लागू होत असल्यामुळे नाव पालटण्याविषयी वरील सिद्धांत उपयुक्त आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(२७.६.२०१८, रात्री १०.५५)

अप्रचलित आणि विचित्र आडनावांचा व्यक्तीवर होणारा परिणाम

आडनावांतील शब्दांतून त्यांच्या अर्थानुसार प्रक्षेपित होणारी स्पंदने आणि शक्ती यांचा आडनाव लावणार्‍या व्यक्तीवर काही अंशी परिणाम होतो.

या सारणीवरून लक्षात येते की, जशी व्यक्तीची पातळी वाढत जाते, तसे तिच्यावर आडनावातील स्पंदनांचा होणारा परिणाम अल्प होऊ लागतो. ६० टक्के पातळीला व्यक्तीच्या आडनावाचा तिच्यावर सर्वांत अल्प परिणाम झालेला आढळतो.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment