
चेन्नई – कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री विजयेंद्र सरस्वती यांच्या शुभहस्ते सनातन संस्थेच्या तमिळ भाषेतील संकेतस्थळाचे उद्घाटन नुकतेच झाले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, समितीचे श्री. प्रभाकरन् आणि सनातन संस्थेचे श्री. जयकुमार उपस्थित होते. श्री. रमेश शिंदे यांनी कांचीपुरम् येथे शंकराचार्य श्री.विजयेंद्र सरस्वती यांची भेट घेऊन समिती आणि सनातन संस्था यांचे कार्य विस्ताराने सांगितले. या वेळी शंकराचार्यांना कांची कामकोटी पीठाचे दिवंगत जगद्गुरु शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांच्या श्रद्धांजलीचे सचित्र वृत्त असलेला पाक्षिक इंग्रजी सनातन प्रभातचा अंक भेट देण्यात आला. या वेळी शंकराचार्यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना आशीर्वाद आणि प्रसाद दिला.
तमिळ भाषेतील संकेतस्थळाची मार्गिका https://www.sanatan.org/tamil
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी जयपूर (राजस्थान) येथील प्रसिद्ध ‘खोले हनुमाना’ला...