रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाच्या भेटीच्या वेळी मान्यवरांना आलेल्या अनुभूती

१. आश्रमात चाललेल्या यज्ञाच्या वेळी सुगंध येणे आणि यज्ञामुळे मन शांत झाल्याने आश्रमातील सात्त्विकता ग्रहण करता येणे

‘रामनाथी आश्रमात एक यज्ञ चालू असतांना मला सुगंधाची अनुभूती आली. यज्ञापूर्वी माझे मन थोडे विचलित झाले होते; पण यज्ञानंतर ते शांत झाले. त्यामुळे मला आश्रमातील सात्त्विकता ग्रहण करता आली. – श्री. श्रवण अग्रवाल, कतरास गढ, जिल्हा धनबाद, झारखंड

२. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रामनाथी आश्रमातील साधकत्ववृद्धी शिबिराच्या वेळी आलेली अनुभूती

‘अकस्मात् रामनाथी आश्रमात प्रकाश आणि झगमगणारे आकाश दिसू लागले. हे पाहून डोळ्यांमध्ये तो प्रकाशच भरून राहिला.’ – मोनिका सिंह, आग्रा (३०.६.२०१६)

३. श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून नामजप (उपाय) करतांना चित्र सजीव होऊन खोली चैतन्याने भरून गेल्याचे जाणवणे

‘२६.१.२०१५ या दिवशी मी माझ्या भावासमवेत श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून नामजप (उपाय) करत होते. त्या वेळी मला चित्रातील श्रीकृष्ण सजीव झाल्याप्र्रमाणे दिसू लागला. श्रीकृष्ण अतिशय सुंदर दिसत होता. मी त्याच्याकडे पाहिल्यावर त्यानेही माझ्याकडे पाहिले. नंतर मला खोली चैतन्याने भरून गेल्याचे जाणवले. मला नामजप (उपाय) करण्यापूर्वी पुष्कळ त्रास होत होता, तरीही ईश्‍वराच्या कृपेने मला एवढी चांगली अनुभूती आली ! पूर्वी मला श्रीकृष्णाविषयी प्रेम वाटत नव्हते; मात्र ही अनुभूती आल्यानंतर मला त्याच्याविषयी प्रेम वाटू लागले. मी त्याला प्रार्थना करून तसे सांगितले. तेव्हापासून मी प्रत्यक्ष ईश्‍वराला प्रार्थना करण्याऐवजी श्रीकृष्णाला प्रार्थना करण्याचा प्रयत्न करते.’

– बारबारा आराउजो, ब्राझिल (२७.१.२०१५)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात