परात्पर गुरु डॉ. आठवले यांना श्रीरामाच्या रूपात पहातांना आवड-निवडीचे भान न रहाणे

१८ आणि १९ मे २०१७ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अमृत महोत्सव सोहळा होता. त्या वेळी सप्तर्षि जीवनाडीपट्टी वाचनातून महर्षींनी सांगितल्याप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टर सोहळ्याच्या वेळी आले. मी या कार्यक्रमाचे प्रक्षेपण पहात होतो. त्यांचे  सभागृहात आगमन होत असतांना भगवान श्रीरामालाच प्रत्यक्षात पहात आहे, असेच वाटत होते. त्यामुळे पुष्कळ वेळ भाव जागृत झाला होता. परात्पर गुरु डॉक्टर आसनावर विराजमान झाल्यावर काही वेळ पडद्यावर केवळ निवेदकच माहिती सांगतांना दिसत होते. मी श्रीरामाला पहायला आतुर झालो होतो; मात्र ७ – ८ मिनिटे निवेदकांनाच पाहिल्याने माझा जीव कासावीस होऊ लागला. निवेदन संपेपर्यंत मला काही त्यांना पहायला मिळणार नाही, असे वाटून शेवटी माझा दुपारचा चहा घ्यायचा राहिला होता; म्हणून मी चहा प्यायला गेलो. चहा घेत असतांना मनात मात्र श्रीरामाचे रूप घोळत होते. चहाचा शेवटचा घोट घेतांना मला जाणीव झाली, मी चहा पीत नसून कशाय पीत आहे. तेव्हा मला आश्‍चर्याचा धक्का बसला; कारण एरव्ही मला कशाय आवडत नाही. पुष्कळ प्रयत्न करूनही कशायची चव आवडत नसल्याने मी चहाच घेतो. आज चहा समजून कशाय ओतून घेऊन ते संपेपर्यत मी चहा न घेता कशाय घेत आहे, याचे मला भानच राहिले नव्हते. देवाच्या स्मरणात सर्व गोष्टींचा विसर पडतो, हे संतांच्या चरित्रांतून वाचले होते. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळेच मला हे अनुभवता आले.

जय गुरुदेव ।

– श्री. धैवत वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.५.२०१७)

Leave a Comment