आधुनिक वैद्यांनी शस्त्रक्रिया करण्यास सांगणे पण २ दिवस कुलदेवी आणि श्री स्वामी समर्थ यांचा नामजप केल्यावर नैसर्गिकरित्या बाळंतपण होणे

‘पहिल्या दोन मुलींच्या जन्मापर्यंत मी विशेष अशी साधना करत नव्हते. त्यानंतर साधना समजल्यापासून तिसर्या मुलीच्या वेळी गर्भारपणात मी श्री स्वामी समर्थांच्या पोथीचे पारायण, गुरुचरित्राचे वाचन, दुर्गासप्तशतीचे वाचन, सारामृताच्या तीन अध्यायांचेे वाचन, श्री स्वामी समर्थांचा ११ माळा नामजप करणे, तसेच काळभैरवाष्टक म्हणणे, देवळात आरतीला जाणे, असे करत होते.

९ मास पूर्ण झाल्यानंतर मला पुष्कळ त्रास होऊ लागल्याने रात्री १.३० वाजता जवळच्या रुग्णालयात नेले. एवढा त्रास होत असतांनाही आधुनिक वैद्यांनी मला रात्री न तपासता सकाळी तपासले. त्यांनी शस्त्रक्रिया करून बाळंतपण करण्यास सांगितले. त्या वेळी शस्त्रक्रिया करण्यास मी सिद्ध नसल्याने मला जिल्हा रुग्णालयात पाठवले. त्या वेळी माझा नामजप सतत चालू होता. तेथे आधुनिक वैद्यांनी तपासल्यावर ‘बाळ आडवे असल्याने शस्त्रक्रिया करावी लागेल’, असे सांगितले. त्यांनी मला ४ दिवसांचा अवधी दिला. सतत कुलदेवी आणि श्री स्वामी समर्थ यांचा नामजप केल्यामुळे २ दिवसांत माझे बाळंतपण नैसर्गिकरित्या झाले.’

– सौ. स्वाती तुळशीदास गुंजेकर, रामनगर, जिल्हा बेळगाव.

प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक, दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment