परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याविषयी मान्यवरांनी काढलेले उद्गार

granth_mukhprushta

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आद्य शंकराचार्य
किंवा समर्थ रामदास यांचे अवतारच म्हणावे लागेल !

आज जाणीवपूर्वक, श्रद्धेने आणि ईश्‍वरी प्रेरणेने जागृती करणारी व्यक्ती कोण असेल, तर डॉ. जयंतराव आठवले ! त्यांना आद्य शंकराचार्य किंवा समर्थ रामदास यांचे अवतारच म्हणावे लागेल. डॉ. आठवले यांना आजच्या भाषेत संत म्हणणे चूक ठरेल. मला तुलना करायची नाही; पण सांप्रदायिक संतांमध्ये आरती स्वतःभोवती असते. असे एक चालकानुवर्तेपण सनातनमध्ये नाही. डॉ. आठवलेे निरीच्छ आहेत !

– ज्योतिर्विद्यावाचस्पति श्री. श्री. भट, डोंबिवली, जिल्हा ठाणे (मासिक धनुर्धारी, जून २०११)

श्रीराम, श्रीकृष्ण अन् अलीकडे शंकराचार्य
यांनी केले, तेच कार्य प.पू. डॉ. आठवले हे करत आहेत !

ईश्‍वराचा अवतार युगातून एकदाच होतो; अंशावतार मात्र वारंवार होत असतो. प.पू. डॉ. आठवले हे परमेश्‍वराचे अंशावतार आहेत. असा अंशावतार झाल्यास त्याच्या ठायी असलेली विवेकशक्ती त्याला स्वस्थ बसू देत नाही. ब्राह्मतेज आणि क्षात्रधर्म यांचे जे कार्य श्रीराम, श्रीकृष्ण अन् अलीकडे शंकराचार्य यांनी केले, तेच कार्य प.पू. डॉ. आठवले हे करत आहेत. कलियुगात या पृथ्वीवर भगवंताने २ विभूतींच्या माध्यमातून जन्म घेतला आहे. त्यातील एक पू. रामदेवबाबा आणि दुसरे प.पू. डॉ. जयंत आठवले ! – भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे, डोंबिवली, जिल्हा ठाणे.

मी आजपर्यंत परात्पर गुरु डॉ. आठवले
यांच्यासम तेजस्वी व्यक्ती कधीही बघितलेली नाही !

प.पू. डॉक्टरांच्या प्रथम भेटीच्या वेळी त्यांच्या ठिकाणी मला केवळ पिवळा आणि पांढरा प्रकाश दिसला. तो अत्यंत तेजस्वी प्रकाश बघून मी आकर्षित झालो. त्यांची कांती तेजोमय दिसत होती. त्यांचे शब्द ऐकत रहावे, असे वाटत होते. त्यांचे बोलणे ऐकून मन प्रसन्न झाले. त्यांचे शब्द अतिशय समर्पक आणि मनाला आनंद देणारे होते. मी आजपर्यंत अशी तेजस्वी व्यक्ती कधीही बघितलेली नाही. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे मी पुढील वाटचाल करणार आहे. – अधिवक्ता श्री. विवेक सदाशिव भावे, लोणावळा (जिल्हा पुणे)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात