परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यात ते बसलेल्या सिंहासनातून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम !

परिणाम अभ्यासण्यासाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’
या उपकरणाद्वारे ‘महर्षि अध्यात्म विश्वूविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !

१. प्रस्तावना आणि उद्देश

‘प्रत्येक व्यक्तीमधून सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित होते. त्याचा प्रभाव त्या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्ती, वस्तू, वास्तू आदींवर होत असतो. उच्च आध्यात्मिक स्तर असणार्यास संतांनी वापरलेल्या वस्तूची गुणवैशिष्ट्ये जाणण्याच्या दृष्टीने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यात त्यांनी बसण्यासाठी वापरलेल्या सिंहासनातून प्रक्षेपित होणार्याय स्पंदनांचा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाच्या साहाय्याने १८ आणि १९.५.२०१७ या दिवशी गोव्यातील सनातन आश्रमात चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्यांची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

२. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत अमृत महोत्सव सोहळ्यात १८ आणि १९ मे या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले सिंहासनावर बसण्यापूर्वी आणि ते साधारणपणे ४ घंटे त्या सिंहासनावर बसून उठल्यानंतर त्या सिंहासनाची ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. या सर्व निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

३. वैज्ञानिक चाचणीतील घटकांविषयी माहिती

३ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सव
सोहळ्यात त्यांनी सिंहासनावर विराजमान होण्यामागील पार्श्वभूमी

१८ आणि १९ मे २०१७ या दिवशी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७५ वा वाढदिवस, म्हणजेच अमृत महोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांचे गुरु संत भक्तराज महाराज यांचे शिष्य म्हणून, म्हणजेच शिष्यभावात अजूनही सेवारत आहेत, तसेच ‘अध्यात्मात स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने स्थूल नमस्कारापेक्षा मानस नमस्कार आणि स्थुलातील वस्तूंचे अर्पण करण्यापेक्षा सूक्ष्म असे मन, बुद्धी अन् चित्त अर्पण करणे, आध्यात्मिक प्रगतीसाठी आवश्यक आहे’, अशी त्यांची शिकवण आहे. त्यामुळे ते कधीही स्वतःला इतरांकडून पुष्प अर्पण करवून घेत नाहीत किंवा नमस्कारही करवून घेत नाहीत; परंतु तमिळनाडू येथील सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यात श्रीकृष्ण आणि श्रीराम यांचे वस्त्रालंकार घालून सिंहासनावर विराजमान व्हावे, त्यांची पुष्पार्चना करावी आणि त्यांना औक्षण करून त्यांच्यासमोर नृत्यसेवा सादर करावी’, अशी महर्षींची आज्ञा असल्याचे सांगितल्यावर त्यानुसार करण्यात आले.

३ आ. १८ मे या दिवशी वापरलेले सिंहासन

अमृत महोत्सव सोहळ्यात १८.५.२०१७ या दिवशी श्रीकृष्णाचे वस्त्रालंकार घातलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी हे सिंहासन ठेवले होते. हे सिंहासन लाकडी होते. त्यावर शास्त्रात सांगितल्याप्रमाणे कीर्तीमुख, स्वास्तिक आदी शुभचिन्हे कोरली होती. (छायाचित्र १)

३ इ. १९ मे या दिवशी वापरलेले सिंहासन

अमृत महोत्सव सोहळ्यात १८ मे या दिवशी श्रीकृष्णाचे वस्त्रालंकार घातलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेल्या सिंहासनातच छायाचित्रणाच्या आणि अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने थोडे पालट केले अन् ते १९.५.२०१७ या दिवशी श्रीरामाचे वस्त्रालंकार घातलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी ठेवले होते. (छायाचित्र २)

परात्पर गुरु डॉ. आठवले वरील दोन्ही सिंहासनांवर त्या त्या दिवशी साधारणपणे ४ घंट्यांहूनही अधिक वेळ बसले होते.

४. ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ उपकरणाद्वारे प्रभावळ मोजणे

४ अ. चाचणीतील घटकांची आध्यात्मिक स्तरावरील
वैशिष्ट्ये वैज्ञानिक उपकरण किंवा तंत्रज्ञान याद्वारे अभ्यासण्याचा हेतू

एखाद्या घटकात (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांत) किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत ? तो घटक सात्त्विक आहे कि नाही किंवा तो घटक आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही ?’, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. उच्च पातळीचे संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक घटकातील स्पंदनांचे अचूक निदान करू शकतात. भाविक आणि साधक हे संतांनी सांगितलेले शब्द ‘प्रमाण’ मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंतु बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र ‘शब्दप्रमाण’ नाही, तर ‘प्रत्यक्ष प्रमाण’ हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक उपकरण किंवा तंत्रज्ञान याद्वारेे सिद्ध करून दाखवली असेल, तरच ती खरी वाटते.

४ आ. ‘यू.टी.एस्’ उपकरणाची ओळख

या उपकरणाला ‘ऑरा स्कॅनर’ असेही म्हणतात. या उपकरणाद्वारे घटकाची (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांची) ऊर्जा आणि त्याची प्रभावळ मोजता येते. हे उपकरण भाग्यनगर, तेलंगणा येथील भूतपूर्व परमाणू वैज्ञानिक डॉ. मन्नम मूर्ती यांनी वर्ष २००३ मध्ये विकसित केले. ‘वास्तू, वैद्यकशास्त्र, पशूवैद्यक शास्त्र, तसेच वैदिक शास्त्र यांमध्ये येणार्याे अडचणींचे निदान करण्यासाठी या उपकरणाचा वापर करता येतोे’, असे ते सांगतात.

४ इ. उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण

४ इ १. नकारात्मक ऊर्जा : ही ऊर्जा हानीकारक असते. याअंतर्गत पुढील २ प्रकार येतात.

अ. अवरक्त ऊर्जा (इन्फ्रारेड) : यात घटकापासून प्रक्षेपित होणारी ‘इन्फ्रारेड’ ऊर्जा मोजतात.

आ. जंबुपार ऊर्जा (अल्ट्राव्हायोलेट) : यात घटकापासून प्रक्षेपित होणारी ‘अल्ट्राव्हायोलेट’ ऊर्जा मोजतात.

४ इ २. सकारात्मक ऊर्जा : ही ऊर्जा लाभदायी असून ती मोजण्यासाठी स्कॅनरमध्ये सकारात्मक ऊर्जा दर्शवणारा +Ve हा नमुना ठेवतात.

४ इ ३. ‘यू.टी.एस्’ उपकरणाद्वारे घटकाची प्रभावळ मोजणे : प्रभावळ मोजण्यासाठी त्या घटकाची सर्वाधिक स्पंदने असणारा नमुना (सॅम्पल) वापरतात, उदा. व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ किंवा तिचे छायाचित्र, वस्तूच्या संदर्भात त्याचे छायाचित्र, वनस्पतीच्या संदर्भात तिचे पान, प्राण्याच्या संदर्भात त्याचे केस, वास्तूच्या संदर्भात तेथील माती किंवा धूळ आणि देवतेच्या मूर्तीच्या संदर्भात मूर्तीला लावलेले चंदन, शेंदूर आदी.

या चाचणीतील सिंहासनाची प्रभावळ मोजण्यासाठी त्यावर कापूस फिरवून तो नमुना म्हणून वापर करण्यात आला आहे.

४ ई. ‘यू.टी.एस्’ उपकरणाद्वारे करायच्या परीक्षणाची पद्धत

चाचणीत वस्तूतील अनुक्रमे इन्फ्रारेड ऊर्जा, अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा मोजतात. त्या मोजण्यासाठी लागणारे नमुने (सॅम्पल्स) ‘यू.टी.एस्’ या स्कॅनरसमवेत दिलेले असतात. वरील तीन परीक्षणांनंतर शेवटी वस्तूची प्रभावळ मोजतात आणि त्यासाठी सूत्र ‘४ आ ३’ मध्ये दिल्याप्रमाणे नमुने वापरतात.

वस्तूतील किंवा वास्तूतील ‘इन्फ्रारेड’ ऊर्जा मोजण्यासाठी ‘यू.टी.एस्’ या स्कॅनरमध्ये प्रथम ‘इन्फ्रारेड’ ऊर्जा मोजण्यासाठी लागणारा नमुना ठेवतात. त्यानंतर परीक्षण करणारी व्यक्ती स्कॅनर विशिष्ट पद्धतीने हातात घेऊन ज्या वस्तूचे परीक्षण करायचे आहे, त्या वस्तूच्या समोर साधारण एक फुटावर उभी रहाते. त्या वेळी स्कॅनरच्या दोन भुजांमध्ये होणारा कोन त्या वस्तूतील ‘इन्फ्रारेड’ ऊर्जेचे प्रमाण दर्शवतो, उदा. स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्यास त्या वस्तूत ‘इन्फ्रारेड’ ऊर्जा पूर्णपणे आहे आणि स्कॅनरच्या भुजा मुळीच न उघडल्यास (म्हणजेच ० अंशाचा कोन) त्या वस्तूत ‘इन्फ्रारेड’ ऊर्जा मुळीच नाही, हे कळते. स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्यास ‘भुजांनी केलेला हा कोन त्या वस्तूपासून किती दूरपर्यंत टिकून रहातो ?’, हे मोजतात. मोजलेले हे अंतर, म्हणजेच त्या वस्तूतील ‘इन्फ्रारेड’ ऊर्जेची प्रभावळ होय. स्कॅनरच्या भुजा १८० अंशापेक्षा अल्प अंशाच्या कोनात उघडल्यास त्याचा अर्थ ‘त्या वस्तूभोवती ‘इन्फ्रारेड’ ऊर्जेची प्रभावळ नाही’, असा होतो. अशाच प्रकारे अनुक्रमे अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा आणि त्या वस्तूतील विशिष्ट स्पंदनांची प्रभावळ मोजतात.

५. चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता

अ. उपकरण हाताळणारी व्यक्ती आध्यात्मिक त्रास (नकारात्मक स्पंदने) नसलेली होती.

आ. उपकरण हाताळणार्या व्यक्तीने परिधान केलेल्या वस्त्रांच्या रंगाचा परिणाम चाचणीवर होऊ नये, यासाठी त्या व्यक्तीने पांढरी वस्त्रे परिधान केली होती.

६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेल्या सिंहासनांची
‘यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner)’ उपकरणाद्वारे केलेली निरीक्षणे

टीप १ – कार्यस्थळी कार्यक्रमाची सिद्धता करायची असल्याने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आगमनापूर्वी काही घंटे आधी सिंहासनाचे निरीक्षण केले आहे.

टीप २ – दुपारी ४.०३ ते रात्री ८.३० या वेळेत परात्पर गुरु डॉ. आठवले या सिंहासनावर बसले होते. त्यानंतर कार्यक्रम संपल्यावर हे परीक्षण केले आहे.

टीप ३ – दुपारी ३.३५ ते रात्री ८.१० या वेळेत परात्पर गुरु डॉ. आठवले या सिंहासनावर बसले होते. त्यानंतर कार्यक्रम संपल्यावर हे परीक्षण केले आहे.

टीप ४ – स्कॅनर १८० अंशाच्या कोनात उघडल्यासच त्या घटकाची प्रभावळ मोजता येते. त्यापेक्षा अल्प अंशाच्या कोनात स्कॅनर उघडला, तर त्याचा अर्थ ‘त्या घटकाभोवती प्रभावळ नाही’, असा होतो.

७. निरीक्षणांचे विवेचन

७ अ. सारणीतील नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे
विवेचन – दोन्ही दिवशी वापरलेल्या सिंहासनात नकारात्मक ऊर्जा मुळीच नसणे

सर्वसाधारण वास्तू किंवा वस्तू यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा असू शकते; परंतु या चाचणीत दोन्ही दिवशी वापरण्यात आलेल्या सिंहासनाच्या सर्वच निरीक्षणांत ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ ऊर्जा मोजतांना स्कॅनरच्या भुजा उघडल्या नाहीत, म्हणजे सिंहासनात पूर्वीही नकारात्मक ऊर्जा नव्हती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ते वापरल्यानंतरही ती आढळली नाही. याचे कारण सूत्र ‘९’ मध्ये दिले आहे.

७ आ. सारणीतील सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे
विवेचन – सिंहासनात मुळातच सकारात्मक ऊर्जा असणे आणि परात्पर
गुरु डॉ. आठवले यांनी सिंहासन वापरल्यानंतर सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ होणे

सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही; पण ‘सिंहासनाच्या सर्वच निरीक्षणांत सकारात्मक ऊर्जा आढळली आहे’, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.

१. १८ मे या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले सिंहासनावर बसण्यापूर्वीच्या निरीक्षणात सकारात्मक ऊर्जा मोजतांना स्कॅनरच्या भुजा साधारणपणे ४५ अंशात उघडल्या, म्हणजे सिंहासनात थोड्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आहे. सिंहासनाची रचना सात्त्विक असल्याचा हा परिणाम आहे.

२. ते सिंहासनावर साधारणपणे ४ घंटे बसून उठल्यानंतरच्या निरीक्षणात स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्या, म्हणजे सिंहासनात सकारात्मक ऊर्जा पूर्णपणे आली आहे आणि तिची स्पंदने सिंहासनापासून १.७२ मीटर दूरपर्यंत पसरली आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळे मुळातच सात्त्विक असलेल्या सिंहासनातील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ वाढल्याचा हा परिणाम आहे.

३. १९ मे या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले सिंहासनावर बसण्यापूर्वीच्या निरीक्षणात स्कॅनरच्या भुजा साधारणपणे १८० अंशाच्या कोनात उघडल्या, म्हणजे सकारात्मक ऊर्जा पूर्णपणे आहे आणि तिची स्पंदने सिंहासनापासून १.३२ मीटर दूरपर्यंत पसरली आहेत. आदल्या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले या सिंहासनावर बसले होते. त्यातून प्रक्षेपित होणार्या सकारात्मक ऊर्जेचा परिणाम दुसर्या दिवशीच्या निरीक्षणात (१५ घंट्यांहूनही अधिक काळ) टिकून राहिला आहे.

४. त्यानंतर ते सिंहासनावर साधारणपणे ४ घंटे बसून उठल्यानंतरच्या निरीक्षणात स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्या, म्हणजे सिंहासनात सकारात्मक ऊर्जा पूर्णपणे आहे आणि तिची स्पंदने सिंहासनापासून १.९२ मीटर दूरपर्यंत पसरली आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातून प्रक्षेपित होणार्याम सकारात्मक ऊर्जेचा हा परिणाम आहे.

७ इ. सारणीतील वस्तूच्या प्रभावळीच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरल्यानंतर सिंहासनाच्या प्रभावळीत पुष्कळ वाढ होणे : सामान्य व्यक्तीची प्रभावळ साधारण १ मीटर असते. ‘सर्वसाधारणपणे एखाद्या वस्तूतील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाल्यास त्या वस्तूच्या प्रभावळीतही वाढ होते आणि नकारात्मक ऊर्जेत वाढ झाल्यास तिच्या प्रभावळीत घट होते’, असे अनेक निरीक्षणांवरून स्पष्ट झाले आहे.

१८ मे या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले बसण्यापूर्वीची सिंहासनाची प्रभावळ १.२६ मीटर आहे. सिंहासन सात्त्विक असल्याचा हा परिणाम आहे. ते सिंहासनावर बसून उठल्यानंतर सिंहासनाची प्रभावळ पुष्कळ वाढली आणि ३.१८ मीटर झाली आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातून प्रक्षेपित होणार्या सकारात्मक ऊर्जेचा हा परिणाम आहे.

१९ मे या दिवशी ते सिंहासनावर बसण्यापूर्वीची प्रभावळ १.७३ मीटर आहे; कारण आदल्या दिवशीच्या सकारात्मक ऊर्जेचा परिणाम सिंहासनावर टिकून राहिला आहे. त्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले सिंहासनावर बसून उठल्यानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेमुळे सिंहासनाची प्रभावळ पुष्कळ वाढली आणि ती ३.३४ मीटर झाली आहे.

८. निष्कर्ष

उच्च आध्यात्मिक पातळी असणार्या संतांनी थोडा वेळही वापरलेल्या वस्तूंमध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते आणि ती काही काळपर्यंत टिकून रहाते. हे या चाचणीतून लक्षात येते.

९. चाचणीतील निरीक्षणांमागील अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण –
संतांनी वापरलेल्या वस्तूंमध्ये सत्त्वगुण वाढल्याने त्या वस्तूंमध्ये चांगले पालट होत असणे

‘निर्जीव वस्तू म्हणजे एक टक्का आणि ईश्वर म्हणजे १०० टक्के आध्यात्मिक पातळी, असे गृहीत धरून त्या तुलनेत व्यक्तीच्या आध्यात्मिक प्रगतीनुसार त्याची वर्तमान आध्यात्मिक पातळी निश्चित करता येते. सर्वसाधारण व्यक्तीची आध्यात्मिक पातळी २० टक्के असते. आध्यात्मिक पातळी ७० टक्क्यांहून अधिक असणार्यांना ‘संत’ म्हणतात.

सर्वसाधारण व्यक्तीमध्ये सत्त्व : रज : तम यांचे प्रमाण २० : ३० : ५० असे असते, तर ७० टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या संतांमध्ये हेच प्रमाण ५० : ३० : २० असे असते, तसेच सामान्य व्यक्तीमध्ये एकूण संख्यात्मक त्रिगुणांचे प्रमाण १०० टक्के असते, तर ७० टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या संतांमध्ये ते १० टक्के किंवा त्याहूनही अल्प असते. हे प्रमाण पुढे घटत जाऊन ९० टक्क्यांपेक्षा अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या संतांमध्ये (परात्पर गुरूंमध्ये) १/१,००० एवढे अल्प होते.’ (संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘गुरूंचे महत्त्व, प्रकार आणि गुरुमंत्र’)

सामान्य व्यक्तीच्या तुलनेत संतांमधील तमोगुणाचे प्रमाण पुष्कळ अल्प होऊन सत्त्वगुणाचे प्रमाण पुष्कळ वाढलेले असते. साधना करणे म्हणजे ईश्वरप्राप्तीसाठी प्रयत्न करणे. ईश्वरप्राप्तीसाठी प्रयत्न, म्हणजेच ईश्वराचे गुण आत्मसात करून त्याच्याशी एकरूप होण्यासाठीचे प्रयत्न. संतपद येणे, म्हणजे साधनेच्या प्रवासात ईश्वराशी एकरूप होण्याच्या टप्प्याच्या निकट पोहोचणे. त्यामुळे तेव्हा अंगी काही अंशी देवपण आलेले असते; म्हणूनच संतांच्या स्पर्शाने त्यांच्या उपयोगातील वस्तू सत्त्वगुणी बनून त्यांच्यात चांगले पालट होतात आणि त्यामुळेच ‘अनमोल साठा’ म्हणून त्या जतन करून ठेवतात. या चाचणीतील सिंहासनाच्या संदर्भातही हेच झाले आहे.’

– श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२२.५.२०१७)

ई-मेल : [email protected]

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात