और्ध्वदेहिक संस्कारांचे (अंत्यसंस्कारांचे) महत्त्व !

गृहस्थाच्या मृत्यूपत्राप्रमाणे मृत्यूत्तर संस्कार न केल्याने त्याचे हाल
होत असल्याचे त्याने एका ख्रिस्ती मुलाच्या माध्यमातून सांगणे आणि त्यांच्या
मुलाने ते ऐकल्याने त्यांनी स्वतःच्या सुनेच्या माध्यमातून सांगितल्यावर मुलाचे डोळे उघडणे

पुण्याला लक्ष्मी रस्त्यावर एक श्रीमंत गृहस्थ रहात होते; परंतु त्यांना धर्माविषयी आदर नव्हता. त्यांनी अनेक संस्थांना देणग्या दिल्या होत्या. त्यांनी स्वतःच्या मृत्यूपत्रात लिहून ठेवले, माझ्या मृत्यूनंतर कोणतेही संस्कार हिंदु पद्धतीने करू नयेत. पुढे ते गृहस्थ वारले. मृत्यूपत्राप्रमाणे त्यांच्या मुलाने त्यांचे और्ध्वदेहिक संस्कार (अंत्यसंस्कार) केले नाहीत. मृत झालेल्या त्या गृहस्थाने ज्या ख्रिस्ती मुलाला स्वतःच्या घरात जागा दिली होती, त्याच्या पत्नीच्या माध्यमातून त्यांनी मी या घराचा मालक आहे. माझ्या मुलाला बोलवा, असे सांगितले. त्यांचा मुलगा मुंबईला होता. तो आल्यावर ते म्हणाले, मी मरून ४ ते ६ मास (महिने) झाले; पण अंत्यसंस्कार न केल्यामुळे माझे अत्यंत हाल होत आहेत. मला अन्नाचे ढीग दिसतात; पण एक कणही पोटात जात नाही. पाण्याचे प्रचंड साठे आहेत; पण थेंबही पाणी पोटात जात नाही. मी एवढ्या संस्थांना देणग्या दिल्या; पण त्याचा काहीही उपयोग होत नाही. त्यांच्या मुलाला हे पटले नाही आणि काही न करताच तो परत गेला. पुढे त्या गृहस्थांनी सुनेच्या माध्यमातून हेच सांगितले, तेव्हा मुलाचे डोळे उघडले. त्यानंतर तो मुलगा प.पू. काणे महाराज यांच्याकडे येताच महाराजांंनी त्याला सांगितले, अंत्यसंस्कार हे करायलाच हवेत, नाहीतर हाल होतात.

संदर्भ : सदाचार आणि संस्कृती, जुलै २०१५