ढगांतून जमिनीवर बरसती धुंद पाऊसधारा ।
भिजे चिंब आसमंत सारा ।
व्याकुळ मनांना हर्षिल टपटप थेंबांचं येणं ।
भूमाता गाईल मग पावसाचं गाणं ॥



देवाने निर्माण केलेल्या या सृष्टीमध्ये ऋतूंना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या ऋतूंपैकी वर्षाऋतू हा भूतलावरील सर्व प्राणीमात्रांना सुखावणारा असतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आनंद देणारा क्षण म्हणजे पहिला पाऊस ! पाऊस पडल्यामुळे जो आनंद आणि आल्हाद आपल्याला होतो, तो काही वेगळाच असतो; पण आपण याचा कधी विचार केला आहे का की, या पावसाकडे पाहून आपल्या मनाला एक वेगळा आनंद का मिळतो ? या संदर्भात लक्षात आलेली काही आध्यात्मिक कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
१. पृथ्वी, आप आणि वायु या तत्त्वांच्या संयोगामुळे
पाऊस पडतांना त्यांच्या थेंबांकडे पाहून आनंद जाणवणे
पावसाचे थेंब भूमीवर पडतात, त्या वेळी पृथ्वीतत्त्वाचा आपतत्त्वाशी संयोग होतो. असे थेंब ज्या वेळी भूमीवर आदळून पुन्हा उसळतात, त्या वेळी उसळण्याच्या या प्रक्रियेमध्ये वायुतत्त्व कार्यरत होते. त्यामुळे पृथ्वी, आप आणि वायु तत्त्व कार्यरत असल्यामुळे हे दृश्य पहातांना मनाला आनंद मिळतो.
२. साचलेल्या पाण्यापेक्षा वहात्या पाण्याच्या प्रवाहाकडे पाहून चांगले वाटणे
पावसाचे पाणी थेंबांच्या स्वरूपात ढगातून भूमीवर पडते, त्या वेळी ते एका ठिकाणी साचून राहिल्यास आपल्याला तितकासा आनंद मिळत नाही. त्याऐवजी ते पाणी वहाते असल्यास आपल्याला अधिक आनंद मिळतो. वहाणारा पाण्याचा प्रवाह आपल्याला जीवनामध्ये कायम कार्यरत आणि प्रवाही रहाण्यास शिकवतो. सृष्टीतील जिवांच्या जीवनात आनंद निर्माण करून निसर्ग स्वतःच्या प्रत्यक्ष कृतीतून करुणा शिकवतो.
– कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय (१४.७.२०१६)
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेल्या उपनेत्राचा (चष्म्याचा) रंग पालटून पिवळसर छटा येणे आणि त्याला...
रुद्राक्षाच्या लोलकाची होणारी हालचाल
सनातन-निर्मित धूम्रवर्ण श्री गणेशमूर्तीची ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘घडा’ या पारंपरिक गरबा नृत्यातून प्रक्षेपित झालेल्या चैतन्याचा साधिकेवर झालेला सकारात्मक परिणाम
पारंपरिक गरबा नृत्यातून प्रक्षेपित झालेल्या चैतन्याचा साधिकेवर झालेला सकारात्मक परिणाम
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साधक-कलाकारांनी काढलेल्या सात्त्विक रांगोळ्या, सात्त्विक चित्रे यामध्ये असणाऱ्या सकारात्मक...