श्रीकृष्णाच्या तळहातावर बसून उपाय करणार्‍या बालसाधिकेचे काढलेले भावचित्र

एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) योया वाले यांनी
श्रीकृष्णाच्या तळहातावर बसून उपाय करणार्‍या बालसाधिकेचे काढलेले भावचित्र

krushna1
१. प्रतिदिन उपायांना बसल्यावर तूच माझ्यावर उपाय कर, अशी मी श्रीकृष्णाला प्रार्थना करते. १५.८.२०१३ या दिवशी नेहमीप्रमाणे प्रार्थना करण्यासाठी डोळे मिटल्यावर मला माझ्यामागे विराट रूपात उभा असलेला श्रीकृष्ण दिसला. त्याच्यासमोर मी लहान बालकाप्रमाणे वाटत होते.

२. श्रीकृष्णाने दोन्ही हात मांडीवर असून मी त्याच्या तळहातावर बसले होते. हे दृश्य पाहून मला माझ्यावर उपाय होत असल्याचे जाणवून पुष्कळ आनंद झाला.

३. श्रीकृष्णाच्या हातातून चैतन्य प्रक्षेपित होऊन ते माझ्या देहाभोवती पसरत होते, तसेच त्याच्या हातांतून मला शक्तीही मिळत होती.

४. थोड्या वेळाने उपायांना बसणार्‍या इतर साधकांचा विचार मनात आला आणि श्रीकृष्ण सतत आपल्यासमवेत असतो अन् या विश्‍वात आपण त्याचा अंश असलेले छोटेसे साधक आहोत, हे त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी मला हे चित्र काढावेसे वाटले.

५. छोटे असणे हे नम्रतेचे प्रतीक असून श्रीकृष्णाला नम्रपणा आवडतो.

श्रीकृष्णाला फूल अर्पण करणार्‍या बालसाधिकेचे काढलेले भावचित्र

एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) योया वाले यांनी
श्रीकृष्णाला फूल अर्पण करणार्‍या बालसाधिकेचे काढलेले भावचित्र

 

krushna2१. चित्रातील बालसाधिकेत श्रीकृष्णाप्रती अत्युच्च भाव आहे. या भावामुळे श्रीकृष्णाच्या चरणी फूल वाहण्याची इच्छा तिच्या मनात निर्माण होते.

२. बालसाधिका एवढी लहान आहे की, तिला श्रीकृष्णचरणी अर्पण करण्यासाठी तोडलेले फूलही जड वाटते. बालसाधिकेच्या चाललेल्या या धडपडीतून श्रीकृष्णाला तिचा त्याच्याप्रती असलेला भक्तीभाव उमजतो आणि तिच्या प्रयत्नांमुळे श्रीकृष्ण प्रसन्न होऊन तिला अलगद वर उचलून घेतो.

३. वरवर तो तिच्याकडे साक्षीभावाने पहात आहे, असे वाटत असले, तरी त्याच्याकडून तिच्याकडे प्रेमाचा ओघ वहात असून ते प्रेम तिच्यात संक्रमित होतांना जाणवते.

४. बालसाधिकेतील भावामुळे श्रीकृष्णाकडून येेणारे चैतन्य आणि आनंद पाकळ्यांमध्ये आकृष्ट झाले आहे.

५. चैतन्य आणि आनंद ग्रहण झालेल्या त्या पाकळ्या हवेत हेलकावे घेत/ तरंगत खाली पडत आहेत आणि पडतांना वातावरणाची शुद्धीही करत आहेत.

६. श्रीकृष्णाला एवढ्या जवळून पहात असतांना बालसाधिकेचा आनंद ओसंडून वहात आहे. श्रीकृष्णाच्या नेत्रकमलांकडे पाहिल्यानंतर तिला त्याच्या परम कृपेची अनुभूती येते. घडणारे सारे शब्दातीत आहे.

७. साक्षात् देवाशीच दृष्टीने जोडले गेल्यामुळे बालसाधिकेत केवळ भाव आणि कृतज्ञताच दिसत आहे. हे चित्र म्हणजे भाव आणि कृतज्ञता यांचा सुरेख संगम आहे.

– (पू.) सौ. योया वाले, युरोप, एस्.एस्.आर्.एफ्. (१५.८.२०१३)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment