सनातनचे प्रेरणास्थान प.पू. डॉ. आठवले यांच्या संदर्भातील अनुभूती दर्शवणारी भावपूर्ण चित्रे (भाग १)

१. सौ. उमा रविचंद्रन् यांना प.पू. डॉक्टरांच्या संदर्भात उमगलेले अवतार-रहस्य

balak_bhav_2_C24_b

१ अ. चित्र काढण्यामागील पार्श्वभूमी

‘प.पू. डॉक्टरांचे थोरले बंधु पू. अप्पाकाका (पू. डॉ. वसंत बाळाजी आठवले) यांनी लिहिलेला ‘परात्पर गुरु प.पू. डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये आणि कार्य (संक्षिप्त ओळख)’ हा सनातनचा ग्रंथ वाचायला आरंभ केला. मला मराठी भाषा चांगली ठाऊक नसतांनाही ग्रंथातील प्रत्येक ओळ वाचतांना माझी भावजागृती होत होती. त्यामुळे मी अंतर्मुख झाले. पू. अप्पाकाका यांचा स्वतःच्या लहान भावाप्रती असणारा अनन्य शरणागतभाव (पू. अप्पाकाका प.पू. डॉक्टरांना गुरुस्थानी मानतात.) इतर कोणत्याही थोरल्या भावाचा त्याच्या लहान भावाप्रती असणे शक्य नाही.

ग्रंथाची साधारण ५० पृष्ठे वाचल्यानंतर पू. अप्पाकाकांची दास्यभक्ती मला अनुभवता आली. ते सर्वसाधारण भाऊ नसून एक आदर्श व्यक्तीमत्त्व आणि दिव्यत्वाचे उत्कृष्ट उदाहरण आहेत. ‘यध्वाचलमाहात्म्य’ यातील पुढील श्लोक मला आठवला आणि प.पू. डॉक्टरांनी माझ्याकडून हे चित्र काढून घेतले.

अनन्तः प्रथमं रूपं लक्ष्मणश्च तथाऽपरम् ।

बलभद्रस्तृतीयं तु कलौ कश्चित् भविष्यति ।।

अर्थ : अनंत हा प्रथम अवतार असून लक्ष्मण हा दुसरा आहे. बलराम हा तिसरा अवतार असून कलियुगामध्येही कोणी एक अवतार होणार आहे.

मला वरील श्लोकाचा नवीन अर्थ समजला असून तो पुढीलप्रमाणे आहे – ‘सत्ययुगामध्ये भगवान नारायणसह शेष आला. त्रेतायुगात भगवान श्रीरामासंगे लक्ष्मण बनला, द्वापरयुगात भगवान श्रीकृष्णाचा सोबती म्हणून बलराम बनला आणि आता पू. अप्पाकाकांच्या रूपात प.पू. डॉक्टरांचे आदर्श शिष्य बनला.’

प.पू. डॉक्टरांचे आत्मचरित्र लिहिण्याची क्षमता कोणात आहे ? महर्षि पतंजली बनून सहस्र शिष्यांना एकाच वेळी योगसूत्रे सांगणारे प्रत्यक्ष आदिशेषाविना दुसरा कोणी असूच शकत नाही. हे चित्र काढून झाल्यावर ग्रंथात दिलेले कोल्हापूर येथील संत रामायणाचार्य पू. तुलसीराम महाराज पोखरकर यांनी प.पू. डॉक्टरांविषयी काढलेले पुढील उद्गार वाचले – ‘प.पू. डॉक्टर म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष सुदर्शनधारी योगेश्वर भगवान श्रीकृष्णच आहेत, यात तीळमात्रही शंका नाही. ते धर्मयुद्ध लढणारे धर्मयोद्धाच होत !’

‘ज्ञान देणारे तेच आहेत आणि अनुभूती देऊन ते चित्रात रूपांतर करून घेणारेही तेच आहेत’, हे मी ओळखले. हे प्रभु, तू सदैव देतच असतोस. तुझ्या कृपेच्या वर्षावात मी डुंबून जाऊन मंत्रमुग्ध झाले आहे. हे भगवंता, तुला अर्पण करण्यासाठी ‘माझे’ असे काही उरले नाही. हे प्रभु, तुझ्या कमलचरणांशी मला संपूर्णपणे शरणागत होता येऊ दे !’ – सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई (२२.५.२०१३)

१ आ. अप्पाकाका शेषनाग आहेत, असा विचार येणे आणि त्याचे उत्तरही समजणे

‘२८.७.२०१३ या दिवशी पू. अप्पाकाकांचा लेख वाचतांना मनात आले, पू. अप्पाकाका शेषनाग आहेत. त्या वेळी देवाने पुढील विचारात त्याचे उत्तरही दिले.

१. त्रेतायुगायत श्रीराम म्हणजे श्रीहरि आणि लक्ष्मण म्हणजे शेषनाग !

२. द्वापरयुगात श्रीकृष्ण म्हणजे श्रीहरि आणि बलराम म्हणजे शेषनाग !

३. आता कलियुगात प.पू. डॉक्टर म्हणजे श्रीहरि आणि पू. अप्पाकाका म्हणजे शेषनाग ! बलरामाचा काही कार्यभाग राहिला असेल; म्हणून तो आता लिखाणातून पूर्ण होत आहे.’

– चरणसेवक श्री. अशोक सारंगधर, सनातन आश्रम, देवद. (२.८.२०१३)

(वर दिलेल्या अनुभूती या त्या साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. ‘जसा भाव तसा देव’ या उक्तीप्रमाणे साधकांचा प.पू.डॉक्टरांप्रती तसा भाव असल्याने त्यांना त्या अनुभूती आल्या आहेत. त्या सर्वांना येतीलच असे नाही. – संकलक)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘‘बालकभावा’तील चित्रे (भाग २) (धर्मसंदेश देणारी श्रीकृष्णाची चित्रे अनुभूतींसह)’

Leave a Comment