ईश्वराचे समष्टी कार्य दर्शवणारी चित्रे (भाग ३)

५. एका बालकाने पांडुरंगाच्या मूर्तीवर छत्री धरणे !

balak_bhav_2_C27_b

५ अ. चित्राची पार्श्वभूमी – पू. राजेंद्रदादांचे उद्गार, हीच चित्र काढण्यामागील प्रेरणा !

‘माझ्या मुलीने मला विठ्ठलाच्या (पांडुरंगाच्या) मूर्तीचे पावसापासून रक्षण करण्यासाठी एका बालकाने त्या मूर्तीवर छत्री धरलेले एक सुंदर छायाचित्र पाठवले होते. ते चित्र मी पू. राजेंद्रदादांना पाठवले. त्यावर पू. दादांनी मला विचारले, ‘‘हे छायाचित्र तुम्हाला कोठून मिळाले ? आणि हे काय आहे ?’’ त्यांच्या या प्रश्नाने मी अंतर्मुख झाले आणि हे चित्र काढण्याची मला प्रेरणाही मिळाली.

५ आ. चित्राची संकल्पना – भ्रष्टाचाररूपी मुसळधार पावसापासून
आपल्या भक्तीच्या छत्रीने बालकाने पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मूर्तीचे रक्षण करणे

द्वापरयुगात इंद्राच्या क्रोधामुळे आलेल्या मुसळधार पावसापासून भगवान श्रीकृष्णाने स्वतःच्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून गोप-गोपी आणि गोमाता यांचे रक्षण केले होते. सध्याच्या कलियुगात काँग्रेस शासनाचा भ्रष्टाचाररूपी मुसळधार पाऊस संपूर्ण देशभर पडत असून प.पू. डॉक्टरच आपल्या संकल्पशक्तीने पंढरपूरच्या विठ्ठलाचे (पांडुरंगाचे) ‘हिंदु विधिज्ञ परिषदे’च्या माध्यमातून रक्षण करत आहेत. चित्रात ‘हिंदु विधिज्ञ परिषदे’ला बालकरूपात रेखाटले असून तो बालक विठ्ठलाचे (पांडुरंगाचे) भ्रष्टाचाररूपी मुसळधार पावसापासून भक्तीच्या छत्रीने रक्षण करत आहे.

पू. राजेंद्रदादांनी मला प्रश्न विचारल्यामुळे मी त्यांच्या चरणी आणि मला अंतर्मुख करून माझ्याकडून हे चित्र काढून घेतल्यामुळे प.पू. डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञ आहे.’ – सौ. उमा रविचंद्रन, चेन्नई (१२.८.२०१३)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘‘बालकभावा’तील चित्रे (भाग २) (धर्मसंदेश देणारी श्रीकृष्णाची चित्रे अनुभूतींसह)’

Leave a Comment