उतारवयातही स्वतःला पालटण्याची तळमळ असलेल्या पुणे येथील पू. विजयालक्ष्मी काळेआजी !

Pu_Shrimati_Vijayalaxmi_Kaleaji_col

१. आजी सतत आनंदावस्थेत, स्थिर आणि शांत असते.

२. ती प्रत्येक कृती चिकाटीने आणि सातत्य ठेवून करते.

३. सेवेची तळमळ

वयोमानाने आता आजीला बाहेर जाऊन सेवा करता येत नाही, तरी ती तळमळीने समष्टीसाठी अधिकाधिक नामजप करते. नामपट्ट्यांचे छत बनवणे, घरी सात्त्विक उत्पादनांचे वितरण करणे, अशा सेवा ती तळमळीने करते. घराजवळ सत्संग चालू व्हावा, यासाठी तिने तळमळीने प्रयत्न केले.

४. साधनेचा आढावा प्रांजळपणे देणे

आजी आढावा देतांना सतत तिचे दोष सांगून आणि योग्य कृती विचारून घ्यायची अन् तळमळीने प्रयत्न करायची. तिची तळमळ बघून मला पुष्कळ उत्साह वाटायचा. आदर्श आढावा कसा द्यायचा ?, हे मला आजीकडून शिकायला मिळाले.

 

५. अपेक्षा करणे या अहंच्या पैलूवर तळमळीने प्रयत्न करणे

५ अ. आजीच्या आईकडून अपेक्षा वाढणे
आणि त्यामुळे आईला तिच्याविषयी प्रतिक्रिया येणे

मी रामनाथी आश्रमात आले. त्यामुळे घरातील सर्व कामे करण्यासाठी माझी आई (आधुनिक वैद्या (सौ.) ज्योती, पू. काळेआजींची मुलगी) एकटीच पडली. त्यात आजोबांचे निधन झाले आणि आईवरचे दायित्व अधिक वाढले. त्या काळात आजीला काही हवे असेल, तर तिच्याकडे आईला सांगणे, हाच पर्याय होता; पण आईला सर्व जमत नसल्याने तिला ताण येऊ लागला. आजीच्या तिच्याकडून अपेक्षाही वाढल्या होत्या. आई बाहेर जायला निघाली की, आजी तिला काहीतरी आणायला सांगायची. त्यामुळे आईला तिच्याविषयी प्रतिक्रिया येऊ लागल्या.

५ आ. आई आणि आजी यांच्यातील संवाद अल्प झाल्यामुळे
आईला एकटे वाटून वाईट वाटणे आणि दोघींमधील प्रेम उणावणे

आई रुग्णालयामधून घरी आली, तरी आजी नामजप करत रहायची. आईशी बोलायची नाही. केवळ काही आणायचे असेल, तर ती सांगायची. इतर वेळी ती नामजप करायची. आई सेवेला जायची. यामुळे आई आणि आजी दोघीच घरात असूनही दोघींमधील संवाद फार अल्प झाला. त्यामुळे आईला फार एकटे वाटून वाईट वाटू लागले आणि दोघींमधले प्रेम उणावू लागले.

५ इ. आजीला वरील सूत्रांसंदर्भात सांगितल्यावर तिने
ते त्वरित स्वीकारून त्यावर प्रयत्न करणार असल्याचे सांगणे

आई आणि आजी जेव्हा रामनाथीला आल्या, तेव्हा आईने ही सर्व सूत्रे पू. सौ. बिंदाताईंना आणि मला सांगितली. तेव्हा मी आजीला त्यासंदर्भात सांगितले. आजीने हे सर्व त्वरित स्वीकारले आणि आता प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

५ ई. थोड्या दिवसांनी आजीमध्ये बराच पालट झाल्याचे
लक्षात येणे आणि ती अन् आई यांच्या नात्यातला गोडवा पुन्हा जाणवू लागणे

थोड्या दिवसांनी मी घरी गेले, तेव्हा आजीमध्ये बरेच पालट झाले होते. आईच्या अणि तिच्या नात्यातला गोडवा पुन्हा जाणवू लागला. आजी तिचा नामजप आई यायच्या आधीच पूर्ण करायची. आई आली की, तिच्याशी बोलायची. आई सेवेला गेली की, ती उर्वरित नामजप करायची. तिच्या अपेक्षाही पुष्कळ अल्प झाल्या. तळमळ या गुणाचे आजी सर्वांत उत्तम उदाहरण आहे. तिने स्वतःमध्ये हे सर्व पालट ४ मासांमध्ये (महिन्यांमध्ये) केले. तिची स्वतःला पालटण्याची तळमळ अधिक असल्यानेच ती एवढी प्रगती करू शकली.

हे गुरुमाऊली, मला आजीचा लाभ करून घेता येऊ दे. तिच्यातील तळमळ, तत्परता, भाव, श्रद्धा आदी गुण मला माझ्यात आणता येऊ दे, हीच तुमच्या कोमल चरणी शरण जाऊन प्रार्थना आहे.

– कु. शिवांजली होसाहोळलू (पू. काळेआजींची नात, वय १६ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.३.२०१६)

 

६. आजी वयस्कर असल्या, तरी त्या
लहान-मोठ्या सर्वांशी त्यांच्या वयाच्या होऊन बोलतात.

 

७. प्रेमभाव

आजी आम्हा तिघांच्या (कु. विश्‍व, मी आणि माझे पती यांच्या) वाढदिवशी गेल्या ६ वर्षांपासून न विसरता भ्रमणभ्राष करून आम्हाला आशीर्वाद देतात. आजी पुष्कळ प्रेमळ आहेत. त्यामुळे त्यांचा सहवास लहान-मोठ्यांना हवाहवासा वाटतो.

 

८. रुग्णालयात उपचारांकरता आलेल्या
साधकांना घरी बोलावून खाऊ-पिऊ घालणे

आजींची मुलगी आधुनिक वैद्या (सौ.) ज्योती एका मोठ्या रुग्णालयात मोठ्या पदावर आहेत. त्यामुळे बरेच साधक त्या रुग्णालयात उपचारांकरता जातात. आम्हीही जात असू. जाण्यापूर्वी आदल्या दिवशी सौ. ज्योती काळे यांना संपर्क करून साधक जायचे. त्या वेळी पू. आजींना साधक येणार आहेत, हे कळले की, त्या घरी बोलवायच्या आणि त्यांना खाऊ-पिऊ घालूनच पाठवायच्या. त्या म्हणायच्या, तुम्ही सगळे सकाळपासून येता आणि विलंब झालेला असतो. पुढे सेवाही असते, तर थोडे खाऊन गेलात की बरे !

 

४. आधार वाटणे

मी पुण्यात असतांना पू. आजींच्या घरी कधीही गेले किंवा त्या कुठल्या कार्यक्रमाला भेटल्या की, त्या विचारायच्या, साधना कशी चालू आहे ? प्रकृती कशी आहे ? विश्‍व आणि यजमान चांगले आहेत ना ? त्यामुळे त्यांचा पुष्कळ आधार वाटायचा.

– सौ. सारिका कृष्णा आय्या, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.३.१०१६)

(वरील सूत्रे श्रीमती काळेआजी संत होण्यापूर्वीची असल्याने त्यांचा उल्लेख पूजनीय असा केलेला नाही. – संकलक)