पुणे येथील श्रीमती विजयालक्ष्मी काळेआजी (वय ८१ वर्षे) संतपदी विराजमान

Pu_Kaleaji_Sanman_col
पू. श्रीमती काळेआजींचा सन्मान करतांना पू. (कु.) स्वाती खाडये

आज सोनियाचा दिन उगवला, श्रीकृष्णाने
संतांच्या मांदियाळीत आणखी एक तुरा खोवला !

पू. काळेआजी यांनी साधकांना दिलेला संदेश

साधनेत आल्यानंतर अष्टांगमार्गाने आपली साधना होत नाही.
कधी कधी आपले मन मायेत इतके गुरफटले जाते की, त्यातून बाहेर कसे पडायचे, हे आपल्याला कळत नाही. कोणाच्या मायेत अडकायचेच असेल, तर गुरूंच्या मायेत अडकूया. त्यातूनच पुढे मोक्षाचा प्रवास चालू राहील. साधना आणि सेवा करत असतांना गुरुदेवांची कृपा (वाहवा) संपादन करून त्यांच्या कृपेस पात्र ठरूया.

     पुणे, १७ मार्च (वार्ता.) – हिंदु राष्ट्र स्थापनेचे तेजस्वी ध्येय डोळ्यांसमोर ठेवून सनातनची घोडदौड चालू आहे. या मार्गावर धावणार्‍या साधकांची आध्यात्मिक उन्नती करवून घेऊन भगवान श्रीकृष्ण धर्मसंस्थापनेच्या कार्याला आध्यात्मिक ऊर्जा पुरवत आहेत. त्याची प्रचीती पुण्यातील साधकांना आज पुन्हा आली. निमित्त होते एका चैतन्यदायी सोहळ्यात सनातनच्या पू. (कु.) स्वाती खाडये यांनी घोषित केलेल्या श्रीमती विजयालक्ष्मी काळे आजी यांच्या आध्यात्मिक भरारीच्या आनंदवार्तेचे ! १७ मार्च या दिवशी विणकर सभागृह येथे पार पडलेल्या सोहळ्यात पू. (कु.) स्वाती खाडये यांनी श्रीमती काळेआजी (वय ८१ वर्षे) संतपदी विराजमान झाल्याचे घोषित केले आणि उपस्थित सर्वच साधक आनंदाच्या भावसागरात बुडाले. ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. दीपाली मतकर आणि पू. (कु.) स्वाती खाडये यांनी घेतलेल्या भावजागृतीच्या प्रयोगानंतर झालेल्या या घोषणेने सर्वच साधकांमध्ये आनंदाची अन् चैतन्याची जणू उधळणच झाली. पू. (श्रीमती) काळेआजी सनातनच्या ५८ व्या संत झाल्या आहेत. या वेळी पू. (कु.) स्वाती खाडये यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून, तसेच भेटवस्तू आणि परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांची प्रतिमा भेट देऊन पू. (श्रीमती) काळेआजींचा सन्मान करण्यात आला.

Pu_Shrimati_Vijayalaxmi_Kaleaji_col

घरातील सदस्य, तसेच साधक यांच्याकडून अपेक्षा करणे, या स्वभावदोषावर मात करून स्वतःमध्ये स्वीकारण्याची वृत्ती वाढवून पू. (श्रीमती) काळेआजी यांनी अल्पावधीत प्रगती केल्याचे पू. (कु.) स्वाती खाडये यांनी सांगितले. निरपेक्ष प्रेम करणे, प्रांजळपणे मनाची प्रक्रिया मांडणे आदी पू. काळेआजींची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये साधकांनी सांगितली. या भावसोहळ्याला पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली.

संतपद प्राप्त केल्याविषयी मनोगत व्यक्त करतांना पू. काळेआजी म्हणाल्या, “मी काहीच केले नाही. देवाची माया अपरंपार आहे. त्याच्या प्रेमानेच मला या पदावर आणून ठेवले आहे.”

पू. काळेआजी यांच्या कन्या आधुनिक वैद्या सौ. ज्योती काळे यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, “अशी आई मला मिळाली, हे माझे मोठे भाग्य आहे. सहा मासांपूर्वी आईविषयी तीव्र प्रतिक्रिया येत होत्या. त्याविषयी सनातनच्या पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याशी याविषयी बोलल्यानंतर त्यांनी मला आईकडून असणार्‍या अपेक्षा न्यून करण्यास सांगितले. मला घरातच आईकडून सत्संग मिळत असतो; परंतु मला त्याची जाणीव नसते. यासाठी मी गुरुदेव आणि पू. आई यांची अपराधी आहे. त्यासाठी मी त्यांची क्षमा मागते. काही दिवसांपूर्वी घरातील श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून ‘श्रीकृष्ण हसत आहे’, असे जाणवले होते. त्या वेळी काहीतरी आनंदाची बातमी मिळेल, असे वाटत होते. मी श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञ आहे.”

पू. काळेआजी यांची नात आाणि सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात राहून साधना करणारी कु. शिवांजली हीसुद्धा भ्रमणभाषद्वारे या सोहळ्यात सहभागी झाली होती. तिनेही पू. आजींविषयी मनोगत व्यक्त केले.

या वेळी उपस्थित साधकांनीही पू. काळेआजी यांची गुणवैशिष्ट्ये सांगितली.

१. श्री. निरंजन दाते – पू. आजींचा स्वभाव शांत आणि स्थिर आहे. त्या सनातन प्रभातमधील प्रत्येक चौकट वाचत आणि त्या संदर्भात काही शंका असतील, तर शंकानिरसन करून घेऊन त्याप्रमाणे कृती करत.

२. सौ. मंगला सहस्रबुद्धे – काही मासांपूर्वी मी पू. आजींशी व्यष्टी साधनेविषयी बोलत होते. त्या वेळी पू. आजी त्यांच्या मनाची प्रक्रिया अत्यंत मोकळेपणाने सांगत होत्या. त्यांच्या यजमानांच्या आजारपणात स्वतःच्या मनाची झालेली प्रक्रिया पू. आजींनी पुष्कळ प्रांजळपणे लिहून दिली होती.

३. सौ. अनुराधा निकम – पू. काळेआजी वयाचा विचार न करता सेवारत रहातात. त्यांच्यात तळमळ असल्यानेच देव त्यांच्याकडून साधना करवून घेत आहे. त्यामुळे ‘आजी लवकरच संतपदाला पोहोचतील’, असे काही दिवसांपूर्वी जाणवले होते.

क्षणचित्रे

१. पू. काळेआजी यांच्या सन्मान सोहळ्याच्या वेळी व्यासपिठावर मोठ्या प्रमाणात दैवी कण आढळून आले.

२. अनेक साधकांनी पू. काळेआजी या संत होणार असल्याची पूर्वसूचना मिळाली असल्याचे सांगितले.

 

पू. श्रीमती विजयालक्ष्मी काळे यांना संतपद प्राप्त
होण्याविषयी मिळालेली पूर्वसूचना आणि सुचलेली कविता !

१. ‘श्रीमती काळेआजी लवकर संतपदी पोहोचणार’, असे वाटणे : ‘दिवाळीत जेव्हा श्रीमती काळेआजी रामनाथी आश्रमात आल्या होत्या, तेव्हा त्यांच्याकडे बघून आणि बोलून त्या लवकर संतपदी पोहोचणार, असे वाटत होते. ही गोड वार्ता ऐकल्यावर मन आनंदी झाले. पू. आईंच्या चरणी वंदन !

२. शुभ वर्तमान ऐकल्यावर सुचलेली कविता ! : पू. श्रीमती विजयालक्ष्मी काळेआई संतपदी विराजमान झाल्याचे कळताच खालील ओळी देवाने सुचवल्या.’

काळेआजी झाल्या संतपदी विराजमान ।
संतांची ती आवली (रांग) । गुरुकृपेने लाभली ।
गुरुकृपेची सावली । आनंदाने दिधली ॥ १ ॥
काळेआजी झाल्या संतपदी विराजमान ।
लाभली ती थोर माय पुणेकरांस ॥ २ ॥
पू. आई, काय मागू तुजला ।
दे तव चरणी आश्रय मजला ॥ ३ ॥

– श्रीमती रजनी नगरकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.३.२०१६)