कॉर्पोरेट कीर्तनकार समर्थभक्त समीर लिमये यांची सनातन संस्थेच्या ठाणे सेवाकेंद्राला सदिच्छा भेट

सनातन संस्थेच्या सद्गुरु अनुराधा वाडेकर यांना आध्यात्मिक ग्रंथ भेट देतांना समर्थभक्त श्री. समीर लिमये

ठाणे, २० सप्टेंबर (वार्ता.) – येथील सनातन संस्थेच्या सेवाकेंद्राला ‘कॉर्पोरेट कीर्तनकार’ संकल्पनेचे जनक आणि समर्थभक्त श्री. समीर लिमये अन् त्यांच्या सहकारी सौ. धनश्री नानिवडेकर यांनी १९ सप्टेंबर या दिवशी सदिच्छा भेट दिली. त्या वेळी सनातन संस्थेच्या सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि ‘पितांबरी उद्योगसमूहा’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

या वेळी सनातन संस्थेचे साधक श्री. सतीश बांगर यांनी श्री. समीर लिमये यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान केला. श्री. लिमये यांनी सद्गुरु अनुराधा वाडेकर यांना आध्यात्मिक ग्रंथ भेट दिले. या वेळी संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि त्यांचे कार्य, तसेच संस्था करत असलेल्या विविधांगी कार्याची माहिती सांगण्यात आली.

यानंतर श्री. समीर लिमये यांनी समर्थ रामदासस्वामींचा ‘दासबोध’ समर्थांच्या कृपेने आधुनिक पद्धतीने मांडण्याची सुचलेली संकल्पना, सध्याच्या काळात डिजिटल मीडियाचा वापर करून कॉर्पोरेट क्षेत्रात केलेली कीर्तनाची सेवा आणि युवा वर्गाला ‘दासबोध’ शिकवण्यासाठी घेतलेली शिबिरे यांविषयी माहिती दिली.