हाताच्या बोटांतून आणि डोळ्यांतून बाहेर पडणार्‍या प्रकाशामध्ये विविध रंग दिसणे

sanshodhan_logo_dainik_col

      देवाने निर्माण केलेल्या या सृष्टीमध्ये अशा अनेक गूढ गोष्टी आहेत, ज्यांची कारणे विज्ञानही अद्याप शोधून काढू शकले नाही. या जगामध्ये काही गोष्टी डोळ्यांनी दिसतात, तर काही गोष्टी डोळ्यांनी दिसत नाही. ज्या गोष्टी डोळ्यांनी दिसत नाहीत, त्या अस्तित्वात नसतात, असे नसते, उदा. वारा डोळ्यांना दिसत नाही, याचा अर्थ तो नाही, असे नाही. आपल्याला त्याचे अस्तित्व जाणवते. त्याचप्रमाणे भूमंडलावरील अस्तित्वात असणार्‍या प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूभोवती तिचे एक ऊर्जावलय असते. प्रत्येकाच्या कार्यानुरूप ते अल्प-अधिक प्रमाणात असते.

 

१. हाताच्या बोटांतून पांढरा प्रकाश बाहेर पडत असल्याचे
दिसणे, अभ्यासिकेतून बाहेरील अंधाराच्या दिशेने काही
काळ एकटक पाहिल्यावर इंद्रधनुष्याप्रमाणे रंग दिसणे आणि
त्यानंतर हातातून बाहेर पडणार्‍या प्रकाशामध्येही रंग दिसणे

        २०.१२.२०१५ या दिवशी गडद पार्श्‍वभूमीवर किंवा अल्प प्रकाश असलेल्या भिंतीच्या पार्श्‍वभूमीवर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हात धरल्यावर हाताभोवती पांढरे वलय दिसले आणि हाताच्या बोटांतून पांढरा प्रकाश दूरवर जात असल्याचे दिसले. उजव्या हाताची पाचही बोटे जुळवून पाहिल्यावर प्रकाश अधिक प्रमाणात बाहेर पडत असल्याचे त्यांना दिसले. त्या तुलनेत पाचही बोटे विलग करून पाहिल्यावर तुलनेत अल्प प्रमाणात प्रकाश बाहेर पडतो, असे जाणवले. २५.१२.२०१५ या रात्री विभागातून बाहेरील अंधाराच्या दिशेने काही वेळ एकटक पाहिल्यावर अंधाराची पार्श्‍वभूमी असलेल्या भागामध्ये वातावरणात इंद्रधनुष्याप्रमाणे रंग दिसले. अन्य साधकांनाही ते पहाण्यास सांगितले असता त्यांनाही ते त्याप्रमाणेच दिसले. त्यानंतर प.पू. डॉक्टरांच्या हातातून बाहेर पडणार्‍या प्रकाशामध्येही रंग दिसले. संतांच्या आणि देवतांच्या चित्रांमध्ये त्यांच्याभोवती वलय अथवा प्रभावळ दाखवली जाते. ही कल्पना नसून प्रत्यक्षात तसे असते, असे जाणवले.

 

२. वरील प्रयोगाच्या संदर्भातील वैज्ञानिक आणि आध्यात्मिक विश्‍लेषण

      प्रकाश पांढरा असतो, असा सर्वसामान्यांचा समज आहे. पांढर्‍या वाटणार्‍या प्रकाशात सातही रंगांची एकरूपता आलेली असते, हे शालेय प्रयोगशाळेमध्ये न्यूटनच्या तबकडीमुळे लक्षात येते. त्याचप्रमाणे निसर्गाच्या प्रयोगशाळेमध्ये आकाशाच्या पार्श्‍वभूमीवर भव्य प्रमाणात साकार करते. (संदर्भ : निसर्गज्ञानाने, मासिक मनशक्ती, फेब्रुवारी २००६)

      शास्त्रज्ञांच्या मते मुख्य तीन रंग आहेत, लाल, निळा आणि हिरवा (RGB). बाकीच्या शेकडो-सहस्रो रंगछटा सृष्टीमध्ये दिसतात, त्या सर्व या मूळ तीन रंगांच्या अल्प-अधिक मिश्रणाने सिद्ध होतात. निळा, हिरवा आणि लाल यांपैकी कोणतेही दोन रंग एकत्र झाले, तर तिसरा एक रंग मिळतो, उदा. निळा अन् हिरवा यांतून जांभळा; लाल अन् निळा मिळून मॅजेंटा; तर लाल अन् हिरवा मिळून पिवळा.

      हिरवा आणि लाल रंग एकत्र आल्यानंतर विशिष्ट पद्धतीने त्याचे विश्‍लेषण होऊन आपल्याला पिवळा रंग दिसतो. हे कसे आणि का होते ?, याचे नेमके उत्तर सांगता येत नाही. काही शास्त्रज्ञांच्या मते लाल आणि हिरव्या प्रकाशाच्या तरंगतर्‍हा वेगवेगळ्या असतात. त्यांचे एकत्रीकरण डोळ्यांत होऊन मनुष्याला पिवळा रंग दिसतो. ही प्रक्रिया केवळ डोळ्यांतील विशिष्ट पेशींमुळे होते. एरव्ही आपण लाल आणि हिरवा रंग एकत्र केला, तर त्यातून काळा रंग सिद्ध होतो, हे आपल्याला ठाऊकच आहे; पण डोळ्यांना मात्र पिवळा रंग दिसतो, तो डोळ्यांच्या विशिष्ट क्षमतेमुळे !

       थोडक्यात सांगायचे, तर वस्तू आणि त्या वस्तूचे ज्ञान प्राप्त करू शकणारा माणूस यांत पहाणार्‍याच्या दृष्टीला, म्हणजेच दृष्टीकोनाला महत्त्व आहे.

(संदर्भ : निसर्गज्ञानाने, मासिक मनशक्ती, डिसेंबर २०००)

– कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्मविश्‍वविद्यालय.

 

अंधारात बघतांना विविध रंग दिसण्याचे कारण

पांढरा प्रकाश काचेच्या प्रिझमवर सोडल्यास तो एका ठराविक कोनामध्ये वळतो. प्रकाशाच्या या वळणाला विवर्तन (डिफ्रॅक्शन) असे म्हणतात. यामुळे प्रकाशाचे सप्तरंगाचे पट्टे दिसतात. दृष्टीचे वैशिष्ट्य हे की, ती व्यक्तीनिष्ठ असते. कोणताही रंग ओळखण्यासाठी मुख्यतः प्रकाश, वस्तू, डोळ्यांची आणि मनाची क्षमता या ४ घटकांची आवश्यकता असते. जेव्हा बाहेर अंधारात बघतो, त्या वेळी डोळ्यांतून प्रक्षेपित होणार्‍या पांढर्‍या प्रकाशाचे सूक्ष्म किरण एका विशिष्ट कोनामध्ये वातावरणात कार्यरत असणार्‍या कणांवर आपटतात आणि त्यामुळे डोळ्यांतून प्रक्षेपित होणार्‍या किरणांना एक वळण प्राप्त होते. त्यामुळे त्याचे विविध रंगांत रूपांतर होते. त्यातून सप्तरंग दिसतात. त्यामध्येसुद्धा लाल, निळ्या आणि हिरव्या रंगाची छटा अधिक प्रमाणात असते.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

तज्ञ आणि अभ्यासू, तसेच या विषयाचे शिक्षण घेणारे
विद्यार्थी यांना वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणार्‍यांना विनंती !

१. देहाभोवती पांढरे कण अन् वलय दिसणे, हातांच्या अन् पायांच्या बोटांमधून धूर आणि प्रकाशाचे किरण बाहेर पडतांना दिसणे, यामागील वैज्ञानिक कारण काय ?

२. पांढरे कण, वलय आणि किरण केव्हा दिसू शकतात ? त्याची वैज्ञानिक किंवा रासायनिक प्रक्रिया काय असते?

३. या संदर्भात कोणत्या वैज्ञानिक उपकरणांद्वारे संशोधन करावे ?,

४. तसेच या संदर्भात या पूर्वी कोणी वैज्ञानिक संशोधन केले असल्यास आम्हाला वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणार्‍यांचे साहाय्य लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू.

– व्यवस्थापक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

संपर्क : श्री. रूपेश रेडकर

ई-मेल : [email protected]

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात