सनातनच्या साधिकांकडून तुळशी वृंदावन घेतलेल्या वारकरी महिलांचे औक्षण !

देवद (पनवेल) – येथील सनातनच्या आश्रमात ग्रामस्थ मंडळाच्या वतीने काढण्यात येणार्या अखंड हरिनाम दिंडीचे प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही आगमन झाले. हे दिंडीचे २१ वे वर्ष आहे. ह.भ.प. गणेश महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार दिंडीचे आयोजन केले जाते. दिंडीच्या माध्यमातून षड्रिपू निर्मूलन आणि व्यसन निर्मूलन यांच्या संदर्भात कार्य केले जाते. आश्रमात दिंडीचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. विणेकरींचे औक्षण, तसेच पाद्यपूजन सनातनचे साधक श्री. अविनाश गिरकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांनी केले. तुळशी वृंदावन आणि कलश मस्तकावर वाहून आणलेल्या वारकरी महिलांचे पाद्यपूजन आणि औक्षण सनातनच्या साधिका सौ. मीनल शिंदे आणि सौ. पूर्वा कुलकर्णी यांनी केले. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत देवद गावातील अनेक वारकरी ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ असा जयघोष करत दिंडीत सहभागी झाले होते. या वेळी आश्रमाच्या वतीने वारकरी बांधवांना प्रसाद देण्यात आला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम यांनी उपस्थितांना संबोधित केले.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !