४.१२.२०२५ या दिवशी दत्तजयंती आहे. त्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, लघुग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत पोचवण्याची सुवर्णसंधी लाभली आहे. या संधीचा लाभ करून घेण्यासाठी साधकांनी पुढे नमूद केलेले ग्रंथ आणि प्रसारसाहित्य यांचे अधिकाधिक वितरण होण्यासाठी प्रयत्न करावेत.

१. सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ
१ अ. ‘दत्त’ : या ग्रंथात दत्ताविषयी इतरत्र बहुधा न दिलेली; पण उपयुक्त अशी पुढील अध्यात्मशास्त्रीय माहिती दिली आहे – ‘दत्त, अवधूत, दिगंबर’, यांसारख्या नावांचा भावार्थ, दत्ताने केलेले गुणगुरु आणि साधकाने गुणगुरु करण्याचे महत्त्व, दत्ताची कार्ये आणि वैशिष्ट्ये, दत्ताच्या परिवाराचा भावार्थ, मूर्तीविज्ञान, अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी दत्ताची उपासना करण्याची आवश्यकता आणि ती कशी करावी ?’ इत्यादी. (‘दत्त’ हा लघुग्रंथही उपलब्ध आहे.)
१ आ. देवता, अध्यात्मशास्त्र, साधना, धार्मिक कृती, आचारधर्म इत्यादींविषयीचे बहुमोल ज्ञान असलेले ग्रंथही उपलब्ध आहेत.
२. देवतांच्या नामपट्ट्या : विविध देवतांच्या नामपट्ट्या, तसेच वास्तूची शुद्धी करण्यासाठी उपयुक्त असे वास्तूछत
३. देवतांची सात्त्विक चित्रे आणि पदके : दत्त, गणपति, शिव, दुर्गादेवी, श्रीकृष्ण, राम, मारुति, लक्ष्मीदेवी यांची लहान, मध्यम आणि मोठ्या आकारांतील चित्रे फ्रेमसहित, तसेच दत्त-गणपति, शिव-दुर्गा, श्रीकृष्ण-गणपति, राम-मारुति यांची चित्रे असलेली पदके (लॉकेट्स)
वरील ग्रंथ, उत्पादने इत्यादींचे प्रदर्शन आयोजित करून प्रदर्शनस्थळी ग्रंथांची माहिती देणारे फ्लेक्स लावू शकतो. साधक आणि वाचक यांनी सदर प्रसारसाहित्य स्थानिक वितरकांकडून घ्यावे. वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी ग्रंथ आणि अन्य प्रसारसाहित्य यांची मागणी स्थानिक वितरकांकडे किंवा ९३२२३१५३१७ या संपर्क क्रमांकावर अथवा sanatanshop.com या संकेतस्थळावर करू शकतात.
सनातनचा ग्रंथसागर जनमानसापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करा !
अखिल विश्वात धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची पायाभरणी करण्यात आणि जिज्ञासूंना धर्माचरणी बनवण्यात सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचा मोलाचा वाटा आहे.
दत्तजयंतीच्या निमित्ताने ग्रंथप्रदर्शन लावतांना अधिकाधिक जणांपर्यंत ग्रंथ पोचवण्यासाठी प्रयत्न करावेत. ‘प्रदर्शनस्थळी अधिकाधिक ग्रंथ प्रदर्शित (डिस्प्ले) केले जातील’, असे पहावे. जागेअभावी काही ग्रंथ प्रदर्शित करणे शक्य नसेल, तर ग्रंथांची माहिती विशद करणारी ग्रंथसूची प्रदर्शनात ठेवावी. अशा वेळी शक्य असल्यास नवीन प्रकाशित झालेल्या ग्रंथांची वेगळी मांडणी करू शकतो.
(२.११.२०२५)
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
एखाद्याला प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार उपाय शोधून देतांना त्याला होणार्या त्रासाचे कारण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
सनातनच्या आश्रमांत पावसाळ्याच्या पूर्वसिद्धतेसाठी खालील साहित्याची आवश्यकता !