देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमात आनंदसोहळा !

देवद (पनवेल), २३ नोव्हेंबर (वार्ता.) : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर अतूट श्रद्धा असणाऱ्या सनातनच्या आश्रमातील श्रीमती सुलभा मालखरेआजी (वय ८४ वर्षे) ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून सनातन संस्थेच्या १३६ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्या, हे आनंददायी वृत्त सनातनच्या पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी एका अनौपचारिक कार्यक्रमात उपस्थित साधकांना दिले. या वेळी सर्व साधकांचा भाव जागृत झाला.
पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी पू. (श्रीमती) सुलभा मालखरेआजी यांना पुष्पहार अर्पण करून शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला.
या वेळी उपस्थित असलेल्या आश्रमातील साधकांनी पू. आजींची गुणवैशिष्ट्ये कथन केली. पू. आजींनी त्यांच्या पूर्वायुष्यातील प्रसंग सांगून ‘त्यांनी त्या प्रसंगांत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा कशी अनुभवली’, तेही सर्वांना सांगितले.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !