भाविकांना आगामी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्यरत रहाण्याचे आवाहन !

अकोला – कार्तिकी पौर्णिमेनिमित्त अकोल्यातील मुकुंद मंदिर, रामदास पेठ येथे श्री दत्त उपासना मंडळ यांच्या वतीने ‘एक दीप सनातन हिंदु धर्म रक्षणार्थ’ हा भव्य दीपोत्सव पार पडला. या कार्यक्रमात सनातन धर्म तथा गौमाता रक्षक प.प. (परमहंस परिव्राजकाचार्य) श्री अभिनव विद्यानृसिंह भारती स्वामी महाराज (जगद्गुरु शंकराचार्य, संकेश्वर पीठ, करवीर) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी त्यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता, हिंदूंनी संघटित होण्याचे महत्त्व आणि सनातन धर्मरक्षणाची आवश्यकता यांविषयी प्रबोधनपर मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी उपस्थित भाविकांना आगामी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्यरत रहाण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात सनातन संस्थेच्या वतीने महाराजांचा शाल, श्रीफळ, हार, तसेच सनातन पंचांग २०२६ आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्यासह असलेले इंदूरचे पू. प्रवीणनाथ महाराज उपस्थित होते. या वेळी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संतांचे आशीर्वाद घेण्यात आले.
सनातन संस्था कार्याविषयी काढलेले गौरवोद्गार !
हिंदु राष्ट्राची स्थापना निश्चित आहे. आम्ही रामनाथी आश्रमात यापूर्वी डॉ. जयंत आठवले यांची भेट घेतली असून सनातन संस्थेचे कार्य अत्यंत प्रेरणादायी आणि राष्ट्रनिर्माणासाठी उपयुक्त आहे.
केरळचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांना ‘सनातन पंचांग २०२६’ भेट

कोच्चि (केरळ) : येथे चालू असलेल्या ‘२८ व्या आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्या’मध्ये एका कार्यक्रमासाठी केरळचे राज्यपाल श्री. राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आले होते. या मेळाव्यात सनातन संस्थेचाही कक्ष उभारण्यात आला आहे. या कार्यक्रमानंतर राज्यपाल आर्लेकर यांनी सर्व कक्षांना भेट देत असतांना त्यांना सनातन संस्थेच्या वतीने श्री. नंदकुमार कैमल यांनी ‘सनातन पंचांग २०२६’ भेट म्हणून दिले.
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी जयपूर (राजस्थान) येथील प्रसिद्ध ‘खोले हनुमाना’ला...
एखाद्याला प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार उपाय शोधून देतांना त्याला होणार्या त्रासाचे कारण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक...
सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !