
मिरज, ३ ऑक्टोबर (वार्ता.) – येथील ब्राह्मणपुरीमधील सनातनच्या आश्रमास १ ऑक्टोबर या दिवशी श्री श्री यति अनिरुद्धतीर्थनंदजी महाराज यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातनचे साधक श्री. योगेश जोशी, श्री. द्वारकाधीश मुंदडा, श्री. रमेश लुकतुके उपस्थित होते. श्री. मुंदडा यांनी महाराजांना सनातन-निर्मित ‘हिंदु राष्ट्र का हवे’ हा ग्रंथ भेट दिला. या वेळी श्री श्री यति अनिरुद्धतीर्थनंदजी महाराज यांना सनातन संस्थेच्या कार्याची माहिती श्री. द्वारकाधीश मुंदडा यांनी दिली, तसेच महाराजांना आश्रमाचे दर्शनही घडवून आश्रमात चालणार्या विविध सत्कार्यांची माहिती दिली.

श्री श्री यति अनिरुद्धतीर्थनंदजी महाराज यांच्या आज्ञेने श्री अंबाबाई मंदिर परिसरात अन्नदान वाटपाचा कार्यक्रम चालू !
श्री श्री यति अनिरुद्धतीर्थनंदजी महाराजांच्या सत्प्रेरणेने १३ एप्रिल २०१९ (चैत्र शुक्ल ८ शके १९४०, रामनवमी) पासून प्रतिशुक्रवारी ब्राह्मणपुरीमधील श्री अंबाबाई मंदिर परिसरात अन्नदान (प्रसाद) वाटपाचा उपक्रम चालू करण्यात आला आहे. श्री अन्नपूर्णा पूजन, श्री अंबाबाई आणि श्री अन्नपूर्णा नैवेद्यार्पण, श्री ललितासहस्रनाम आणि श्री विष्णुसहस्रनामाचे मंदिरात सामूहिक पठण करण्यात आले. प्रति शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता अनेक भाविक प्रसादाचा लाभ घेतात. द्रोणातून प्रसाद वाटप केले जाते. नवरात्रोत्सवात हे अन्नदान ९ दिवस सकाळी ९.३० वाजता चालू होते, तसेच नवरात्रोत्सवात श्री ललितासहस्रनाम आणि श्री विष्णुसहस्रनाम पठण सकाळी १० वाजता होत होते.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !