
मुंबई – ‘निसर्गोपचार आणि योग’ या क्षेत्रात केलेल्या अतुलनीय रुग्णसेवेसाठी पनवेल येथील नॅच्युरोपॅथी तज्ञ डॉ. दीपक जोशी यांना ‘आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन’कडून वर्ष २०२५ चा ‘आयुष महासन्मान पुरस्कार’ १४ सप्टेंबर या दिवशी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रदान करण्यात आला. या प्रसंगी भारतातील शेकडो आयुष डॉक्टर आणि चिकित्सा करणारे (थेरपिस्ट) मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी ‘युनायटेड नेशन चाईल्ड अँड वुमेन’च्या सल्लागार डॉ. मंगला कोहली, ‘राजकोट अँड उदयपूर एम्.एस्.एम्.ई. (मायक्रो, स्मॉल, मिडीयम एंटरप्रायजेस’चे साहाय्यक संचालक डॉ. एम् गणेश, ‘पी.पी.डी.सी. (प्रोसेस अँड प्रोडक्ट डेव्हलपमेंट सेंटर’) मिनिस्ट्री ऑफ एम्.एस्.एम्.इ. भारत सरकार अधिकारी डॉ. प्रणव पांड्या आणि ‘ए.आय.एम्.ए.’ (ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन) चे राष्ट्रीय सल्लागार डॉ. प्रवीण जोशी यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
नॅच्युरोपॅथी तज्ञ डॉ. दीपक जोशी यांनी या पुरस्काराचे श्रेय त्यांचे गुरु आणि सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या चरणी अर्पण केले आहे. ‘त्यांच्या कृपाशीर्वादानेच मला हा सन्मान मिळाला’, असे मत नॅच्युरोपॅथी तज्ञ डॉ. दीपक जोशी यांनी व्यक्त केले.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !