
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत गोव्यातील फोंडा येथे आयोजित ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त सनातन संस्थेने हिंदु धर्म आणि राष्ट्र यांच्या रक्षणासाठी विशेष कार्य करणार्यांना ‘हिंदु राष्ट्ररत्न’ आणि ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार देण्याची घोषणा केली होती. त्यापैकी ‘गंगारत्न’ अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांना हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. या वेळी त्यांच्या पत्नी अधिवक्ता सरिता सिंह याही उपस्थित होत्या.
ध्येय ठेवून तळागाळात काम करणारी एकमेव सनातन संस्था ! – अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मी पुष्कळ आभार मानतो आणि त्यांना वंदन करतो. मी त्यांचा नेहमीच ऋणी राहीन. मी अनेक संस्थांमध्ये काम केले आहे; परंतु सनातन संस्था ही एकमेव संस्था आहे, जी स्वतःचे ध्येय ठेवून प्रामाणिकपणे काम करत आहे. गोव्यात आयोजित ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ला समाजाचा मिळालेला प्रतिसाद आणि ‘सनातन राष्ट्रा’च्या संकल्पनेला मिळालेला पाठिंबा यांमुळे मी पुष्कळ आनंदी आहे. हा कार्यक्रम अतिशय कौतुकास्पद होता आणि येत्या काळात तो निश्चितच मैलाचा दगड बनेल. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे हिंदु राष्ट्राचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण व्हावे’, अशी मी देवाला प्रार्थना करतो. त्यासाठी आपण सर्व हिंदूंनी एकत्र येणे आवश्यक आहे.
अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता यांचा संक्षिप्त परिचयअधिवक्ता अरुणकुमार गुप्ता हे गेल्या २० वर्षांपासून गंगानदीचे प्रदूषण थांबवणे, गंगा तिरावरील औद्योगिक प्रदूषणकारी प्रकल्पांवर बंदी घालणे आणि गंगाजलावर संशोधन करणे यांसाठी निःस्वार्थपणे झटत आहेत. अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांना गंगानदीशी संबंधित ‘ॲमिकस क्युरी’ (न्यायालयीन मित्र) या पदावर नियुक्त केले आहे. त्यांना कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु स्वामी शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांनी ‘गंगारत्न’ ही पदवी देऊन आशीर्वाद दिला आहे. उत्तरप्रदेशातील एका स्वयंसेवी संस्थेने त्यांना ‘उत्तरप्रदेश रत्न’ पुरस्कार प्रदान केला आहे. ‘राष्ट्रीय नदी गंगा (पुनरुज्जीवन, संवर्धन आणि व्यवस्थापन), २०१७’ या विधेयकाचा मसुदा सिद्ध करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. |
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्याचा जागर...