पू. रवींद्र गोंधळेकर

पुणे – सनातनचे साधक श्री. रवींद्र गोंधळेकर (वय ८० वर्षे) हे सनातन संस्थेचे १३४ व्या व्यष्टी संतपदी, तर साधिका श्रीमती वर्षा भिडे (वय ७३ वर्षे) या सनातन संस्थेच्या १३५ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्याची घोषणा पुणे येथे पार पडलेल्या एका आनंददायी सोहळ्यात करण्यात आली. याच वेळी हिंदुत्वनिष्ठ डॉ. नीलेश लोणकर यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचीही घोषणा करण्यात आली. सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी पुणे येथील सातारा रस्ता येथे झालेल्या एका अनौपचारिक सोहळ्यात ही आनंदवार्ता सर्वांना दिली.
हिंदुत्वनिष्ठ डॉ. नीलेश लोणकर यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी

या प्रसंगी सनातन संस्थेच्या संत पू. (सौ.) मनीषा पाठक, तसेच पू. रवींद्र गोंधळेकर, पू. श्रीमती वर्षा भिडे आणि डॉ. नीलेश लोणकर यांचे कुटुंबीय अन् काही साधक उपस्थित होते. ही आनंदवार्ता कळाल्यानंतर सर्व साधकांची भावजागृती झाली. या सोहळ्याच्या माध्यमातून श्री गणेशाने श्री गणेशचतुर्थीचा कृपाप्रसादच दिल्याचे सर्व साधकांनी अनुभवले.

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !