राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे सनातनच्या आश्रमाला भेट देण्याचे आश्वासन !

कांदळी (जिल्हा पुणे) – सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या कांदळी (जिल्हा पुणे) येथील आश्रमात मौजीबंधनाच्या सोहळ्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक प.पू. डॉ. मोहनजी भागवत यांचे आगमन झाले. या वेळी सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी सरसंघचालकांना सनातनच्या आश्रमात भेटीचे निमंत्रण दिल्यावर त्यांनी आश्रमाला भेट देण्याविषयी होकार दर्शवला.
️ RSS Chief Dr. H.H. Dr Mohanji Bhagwat Promises Visit to Sanatan Ashram!
Kandali, Pune: During his visit to the Samadhi Sthal of Bhaktaraj Maharaj, Shri @AbhayVartak Spokesperson @SanatanSanstha met the Sarsanghchalak.
Upon invitation, Dr. Bhagwat graciously agreed to… pic.twitter.com/vO9aiBOdxf
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 28, 2025
सनातनच्या अकोला येथील साधिका सौ. मेघा वसंत जोशी (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांचे नातू चि. श्रीपाद (आध्यात्मिक पातळी ५२ टक्के) आणि चि. यशोधन (आध्यात्मिक पातळी ५१ टक्के) यांच्या मौजीबंधनाचा कार्यक्रम कांदळी येथील प.पू. भक्तराज महाराजांच्या आश्रमात पार पडला. त्या वेळी सरसंघचालकांसह संघाचे कार्यकर्ते, तसेच प.पू भक्तराज महाराजांचे भक्त उपस्थित होते. या वेळी सरसंघचालकांनी प.पू. भक्तराज महाराजांच्या पावन समाधीस्थळाचे, तसेच श्रीराम मंदिराचे भावपूर्ण दर्शन घेतले.
मौजीबंधनाच्या कार्यक्रमाप्रसंगी आशीर्वचनपर मार्गदर्शन करतांना प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणाले, ‘‘मौजीबंधनाचा संस्कार झाल्यावर बटू विद्यार्जनासाठी सिद्ध होतात. विद्यार्जनाच्या कालावधीत विश्वात जे जे उत्तम आहे, ते शिकण्याचा प्रयत्न करतील आणि त्यानंतर गृहस्थाश्रमात जे जे उत्तम प्राप्त केले, ते समाजाला देण्याचा प्रयत्न करतील.’’

या प्रसंगी सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी नुकत्याच गोवा येथे पार पडलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ची छायाचित्रे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांना दाखवली, तसेच महोत्सवाविषयीची माहिती दिली. या महोत्सवाच्या वेळी पार पडलेल्या यज्ञांचा प्रसाद, श्री व्यंकटेश बालाजीची चांदीची मूर्ती आणि ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे संक्षिप्त चरित्र’ हा ग्रंथ या वेळी सरसंघचालकांना भेट देण्यात आला.
या वेळी प.पू. भक्तराज महाराज यांचे पुत्र पू. नंदूभैय्या उपाख्य हेमंत कसरेकर यांनी प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे स्वागत केले. यापूर्वी नागपूर येथे झालेल्या भेटीत पू. नंदूभैय्या कसरेकर यांनी सरसंघचालकांना प.पू. भक्तराज महाराजांचे माहात्म्य सांगितले होते, तसेच कांदळी येथील समाधीस्थळाचे दर्शन घेण्याचे निमंत्रण दिले होते. मौजीबंधनाचे औचित्य साधून सरसंघचालकांनी येथे भेट दिली. श्रीरामचंद्र देव ट्रस्ट एवं प.पू. भक्तराज महाराज समाधी ट्रस्ट, कांदळीचे विश्वस्त श्री. शरद कसरेकर आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे पुत्र रवींद्र कसरेकर यांनी सरसंघचालकांना समाधीस्थळ, तसेच आश्रम परिसर यांची माहिती दिली.
याप्रसंगी सरसंघचालकांचे मित्र आणि वनवासी कल्याण आश्रमाचे प्रांत उपाध्यक्ष श्री. शरद किटकरू आणि सनातनच्या नागपूर येथील साधिका सौ. उषा किटकरू, (श्री. आणि सौ. किटकरू हे बटू चि. यशोधन याचे आजी-आजोबा आहेत.) तसेच ‘अल्ट्राटेक सिमेंट’ आस्थापनाचे अध्यक्ष श्री. मंगेश वाघ, सेल्स प्रमोटर श्री. नितीन धूत उपस्थित होते.
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्याचा जागर...