
कोल्हापूर, १९ जून (वार्ता.) – गोवा येथे मे महिन्यात झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे मार्गदर्शन ऐकून नेमकी साधना काय करायला हवी ? याचे मार्गदर्शन मिळाले. महोत्सवाच्या कालावधीत झालेल्या अन्य संत, हिंदुत्वनिष्ठ यांच्या मार्गदर्शनातून हिंदु धर्मावर होणारे आघात आणि त्यासाठी करावयाच्या उपाययोजना लक्षात आल्या. तरी ‘यापुढील काळात आम्ही नियमितपणे धर्मकार्य करू’, असा निर्धार ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त सहभागी हिंदुत्वनिष्ठ आणि उद्योजक यांनी केला. येथील ‘आत्मदर्शन सभागृहा’त महोत्सवातील सहभागींसाठी सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांचे मार्गदर्शन आयोजित केले होते. त्या प्रसंगी सर्वांनी हा निर्धार व्यक्त केला.

या प्रसंगी सद्गुरु स्वाती खाडये यांनी येणार्या आपत्काळाविषयी सर्वांनाच अवगत करून साधना करण्याचे महत्त्व सांगितले, तर हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी यांनी धर्मकार्यात कशा प्रकारे सहभागी होऊ शकतो ? हे सोदाहरण स्पष्ट केले. या वेळी सनातन संस्थेच्या डॉ. शिल्पा कोठावळे यांच्यासह अनेक हिंदुत्वनिष्ठ, उद्योजक, जिज्ञासू सहभागी झाले होते. धर्मकार्य करण्यासाठी महिन्यातून एकदा एकत्र येण्याचेही सर्र्वांनी या वेळी निश्चित केले. याचसमवेत येणार्या काळात संकटांना तोंड देण्यासाठी पक्षभेदाचे राजकारण बाजूला ठेवून हिंदु म्हणून एकत्र आले पाहिजे, तसेच हिंदूंच्या संरक्षणासाठी प्रत्येक गावात ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ राबवून हिंदूंची वज्रमूठ निर्माण करण्याचेही ठरवण्यात आले.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !