
मिरज, २६ जानेवारी (वार्ता.) – केज, बीड येथील प्रसिद्ध श्रीराम कथावाचक पू. समाधान शर्मा महाराज आळतेकर हॉल येथे आले असता यांची सनातनच्या साधकांनी सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी त्यांना ‘सनातन पंचांग २०२५’, तसेच दैनिक ‘सनातन प्रभात’ भेट देण्यात आले. या प्रसंगी ‘आळतेकर हॉल’चे श्री. अविनाश आळतेकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. माधवराव गाडगीळ, सनातन संस्थेचे श्री. प्रकाश पोरे आणि श्री. द्वारकाधीश मुंदडा अन् श्री. मनोहरजी सारडा उपस्थित होते. पू. समाधान शर्मा महाराज यांनी सनातनच्या कार्याचे कौतुक करून समाजाला या कार्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
अयोध्या येथील श्रीराममंदिराच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने सांगलीत पू. समाधान शर्मा महाराज यांच्या सुरेल वाणीत १८ जानेवारीपासून कल्पद्रुम मैदान, नेमीनाथनगर, विश्रामबाग येथे श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कथा २६ जानेवारीअखेर आयोजन करण्यात आले होते. ही कथा आयोजित करण्यात श्री. मनोहरजी सारडा, तसेच त्यांचे सहकारी यांचा पुढाकार होता.

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !