देवघर हा आपल्या भवनातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. देवघरातून संपूर्ण घरामध्ये वैश्विक ऊर्जा, म्हणजे चैतन्याचे प्रक्षेपण होत असते. घरात रहाणार्या सर्वांनाच येथून ऊर्जा प्राप्त होत असते; पण सध्या वास्तूनिर्मितीच्या वेळी देवघराचा तेवढा प्राधान्याने विचार होतांना दिसत नाही. घर बांधून झाल्यावर स्वयंपाकघरातील जागा देवघरासाठी ठेवली जाते. सध्या बर्याच सदनिकांमध्ये देवघरासाठी वेगळे नियाेजन नसते, तेव्हा एखाद्या भिंतीवर लाकडी देव्हारा लावून ते सिद्ध केले जाते. अशा वेळी देवघराविषयी सर्व नियमांचा विचार करणे कठीण जाते. यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून रहाण्याचे प्रमाणही न्यून झाले आहे. म्हणून नवीन घर बांधतांना आपण कोणत्या गोष्टींचा विचार करायला हवे, ते आता आपण पाहूया.

१. देवघर कोणत्या दिशेला असावे ? आणि देवघरातील मूर्तींची उंची
बृहस्पति हा ईशान्य दिशेचा स्वामी आहे, ज्याला ‘ईशान कोना’सुद्धा म्हटले जाते. ईशान ईश्वर किंवा देव आहे. अशाप्रकारे ही देवाची / गुरूंची दिशा आहे. म्हणून तेथे देवघर ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
‘ईशान्यां देवतागेहं ।’ – बृहत्संहिता
देवघर हे घराच्या ईशान्य दिशेला असावे, याविषयी सर्वच वास्तूशास्त्रकारकांनी सांगितले आहे. पूर्वेकडे स्वतःचे मुख होईल, असे शिखी पदामध्ये देवघर घेतल्यास किंवा अदिती पदात उत्तरेकडे स्वतःचे मुख होईल, असे देवघर घेतल्यास त्यामुळे तेथे रहाणार्यांचे शरीर बळकट आणि आरोग्य चांगले रहाण्यास सकारात्मक ऊर्जेचा लाभ होत असतो.
आरभ्यैकाङ्गुलादूर्ध्वं पर्यन्तं द्वादशाङ्गुला ।
गृहेषु प्रतिमा पूज्या नाधिका शस्यते तत: ।।
तदूर्ध्वं नवहस्तान्तं पूजनीया सुरालये ।
दशहस्तादितो याऽर्चा प्रासादेन विनार्चयेत् ।। – रूपमंडन, अध्याय १, श्लोक ७, ८
अर्थ : भवनात पूजा करावयाची मूर्ती एक अंगुल (३ ते ४ इंच) ते १२ अंगुल (९ इंच) याच्यामधील ठेवून पूजा करता येते. १२ अंगुलपेक्षा अधिक उंची असल्यास अशा मूर्ती देवालयात ठेवून पूजा करावी. १० हातापेक्षा अधिक उंच असलेल्या मूर्ती मंदिराबाहेर ठेवून पूजा करावी.
२. देवघर कसे असावे ?
देवघर बनवतांना ते थेट फरशीवर ठेवू नये. देवघर संगमरवरी किंवा लाकडाचे बनलेले असावे. काचेपासून बनलेली देवघरे टाळा. देवघर कोठे आहे हे यापेक्षा तेथे नियमितची पूजा-अर्चा भावपूर्ण होते ना, हेसुद्धा महत्त्वाचे असते. कुटुंबासाठी एकत्र बसून प्रार्थना करण्यास पुरेशी जागा आहे ना, याची निश्चिती करावी. देवघराच्या क्षेत्रात उर्जेचा चांगला आणि निरोगी प्रवाह असावा. ते नेहमी स्वच्छ ठेवावे. आपल्याला देवघरातून शांतता लाभणे सर्वांत महत्वाचे आहे.
देवघर हे भूमीपासून काही उंचीवर असावे; परंतु पूजा नेहमी बसून करता येईल, या पद्धतीने त्याची व्यवस्था असावी. घरातील देवघराला कळस नसावा. पूजा करतांना पूजा करणार्याचे मुख हे पूर्व किंवा उत्तर दिशेला असायला हवे.
३. मूर्तीचे प्रकार आणि त्याचे परिणाम
अ. सुवर्ण : शांती, ऐश्वर्य, मोक्ष
आ. चांदी : समृद्धी, धन वृद्धी, सुख, संतोष
इ. तांबे : संतती, समृद्धी
ई. पितळ : विद्या, आयुरारोग्य, धनवृद्धी
उ. कांसे : आरोग्य, आयु
ऊ. लोह, शिसे आणि जस्त : कटुता, दु:ख, अनारोग्य, हिंसक वृत्ती
ए. माती : कामना पूर्ती (अल्प काळ लाभदायक)
ऐ. स्फटिक : धनलाभ
ओ. पंचधातू (पितळ ५, तांबे ४, कांस्य ३, चांदी २, सोने १ या प्रमाणात) : सर्वार्थ साधन
घरातील देवघरात २ शिवलिंगे, २ शाळीग्राम (१, ४, ६, ८ प्रमाणात घ्यावे), २ सूर्यकांत, ३ देवी, ३ गणपती, २ शंख, आयुधासह उग्र दशावतारी मूर्ती, अग्नीने दग्ध मूर्ती, भग्न मूर्ती, मृत व्यक्तीचे टाक देवघरात असू नये.
संदर्भ ग्रंथ : ‘मयमतम्’, ‘मानसार’, ‘रूपमंडन’, ‘बृहत्संहिता’
– श्री. श्रेयस पिसोळकर (वास्तूविशारद, ज्योतिष होराभूषण, होरारत्न), फोंडा, गोवा. (१९.३.२०२६)
४. देवघराविषयी घ्यायची काळजी
१. देवघरात मध्यभागी गणपती, त्याच्या डाव्या हाताला स्त्री आणि उजव्या हाताला पुरुष देवता अशी मांडणी करावी.
२. देवघर सजवण्यासाठी ताजी फुले वापरावीत.
३. चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी सुगंधी उदबत्त्या, धूप लावू शकतो.
४. उदबत्ती, पूजा सामग्री आणि धार्मिक पुस्तके ठेवण्यासाठी देवघराजवळ एक छोटासा खण सिद्ध करावा.
५. देवघराच्या खाली अनावश्यक वस्तू ठेवण्याचे टाळावे. या ठिकाणी केराचा डबा ठेवणे टाळावे.
६. मृत पूर्वजांची छायाचित्रे देवघरात ठेवू नयेत.
वास्तू लाभदायी होण्यासाठी लक्षात घेण्याची सूत्रे !
दिशांचे महत्त्व आणि दिशा-उपदिशा यांचे परस्परावलंबित्व !
अष्टदिशांची वैशिष्ट्ये आणि अष्टदिक्पाल !
भूमीची शुभाशुभता आणि भूमी परीक्षण !
ऊर्जा आणि वास्तूशास्त्र !
भूमी प्लव (उतार) आणि वास्तूशास्त्र !
फारच छान माहीती मिळाली
Khup upyukt mahiti milali
खूपच उपयोगी माहिती मिळाली आहे पण अजून थोडी जास्त माहिती मिळाली असती तर चांगले झाले असते देवघराविषयी व त्याच्या मांडणी विषयी विस्तार
नमस्कार राजू जी
आपल्याला माहिती आवडली हे बघून आनंद झाला. या संकेतस्थळावरील माहिती सनातनच्या ग्रंथ संपदेतून घेतलेली असते. आपल्याला या विषयी किंवा देवपूजा, उपासना, आणि अन्य धार्मिक कृतींमागील शास्त्रीय माहिती जाणून घेण्याची इच्छा असेल तर सनातनचे ग्रंथ नक्की वाचा. हे सर्व ग्रंथ पुढील लिंक वर उपलब्ध आहेत.
https://sanatanshop.com/shop/marathi-books/mr-hindu-dharma-and-sanskar/mr-science-behind-religious-acts/
आपली
सनातन संस्था
खुपच उपयोगी माहिती मिळाली खुप खुप आभार
फार चागंलि माहीती मीळती
कशाप्रकारची माहीती मीळणे काळाची गरज आहे
Nice information
Thanks
देवाला नैवेद्य दाखवताना कुठला मंत्र म्हणावा
नमस्कार राणी जी
आम्हाला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद. देवाला नैवेद्य अर्पण करतांना पुढील मंत्र म्हणू शकतात
नैवेद्यं गृह्यतां देव भक्तिं मे ह्यचलां कुरु ।
ईप्सितं मे वरं देहि परत्र च परां गतिम् ॥
शर्कराखण्डखाद्यानि दधिक्षीरघृतानि च ।
आहारं भक्ष्यभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम् ॥
अर्थ : हे भगवंता, या नैवेद्याचा स्वीकार कर आणि तुझ्याप्रती माझी भक्ती वाढव. मला या जन्मी माझे इष्टार्थ प्राप्त होऊन पुढील गतीही चांगली मिळू दे. साखर, दही, दूध आणि तुपापासून तयार केलेला हा नैवेद्य ग्रहण कर आणि मला आशीर्वाद प्रदान कर.
नैवेद्य अर्पण करण्याचा विधी आपल्या पुरोहितांकडून समजून घ्यावा अशी विनंती.
आपली,
सनातन संस्था
धन्यवाद! खूप छान माहिती मिळाली.