
हिंगलाजमाता मंदिर हे ५१ शक्तिपिठांपैकी एक असून ते पाकिस्तानमध्ये आहे. या ठिकाणी सतीचे ब्रह्मरंध्र (डोके) पडले होते. ते बलुचिस्तानच्या लारी तालुक्यामध्ये एका घनदाट खोर्यात आहे. हिंगोल नदीच्या काठावर आणि मकरान वाळवंटाच्या खेरथार टेकड्यांत वसलेले श्री हिंगलाजमाता मंदिर कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान आहे.
श्री हिंगलाजमातेची स्वयंभू शिळा
श्री हिंगलाजमाता मंदिर एका नैसर्गिक गुहेमध्ये आहे. मंदिरामध्ये एक मातीची वेदी आहे. या मंदिरात देवीची मूर्ती नसून स्वयंभू शिळा आहे. ही शिळा शेंदुराने मढवलेली आहे. त्याला संस्कृतमध्ये ‘हिंगुला’ म्हणतात. त्यापासून कदाचित् श्री हिंगलाजमाता हे नाव मिळाले असावे. या ठिकाणी श्री हिंगलाजदेवीला ‘हिंगुलादेवी’ म्हणूनही संबोधतात. मागील ३ दशकांमध्ये हे मंदिर पुष्कळ लोकप्रिय झाले आहे. देवी डोडिया राजपूतांसाठी प्रथम कुलदेवी म्हणून पूजनीय आहे. या परिसरात हिंगलाजदेवी मंदिराखेरीज इतरही पूजास्थळे आहेत.’
(संदर्भ : संकेतस्थळ)
महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या काही देवींची माहिती आणि त्यांचा इतिहास
कुलु खोर्यामध्ये अधिष्ठात्री देवता ‘बिजली महादेव’ आणि ‘बेखलीमाता’ (भुवनेश्वरीदेवी) यांचे आहे चैतन्यमय स्थान !
चोटीला (गुजरात) येथील आदिशक्तीचे रूप असलेल्या श्री चंडी-चामुंडा देवीचे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घेतलेल्या...
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी शेषनागाच्या फुंकरीतून निर्माण झालेल्या ‘मणिकर्ण तप्तकुंड’ (जिल्हा कुलु) या स्थानाला...
कर्नाटक राज्यातील शृंगेरी (जिल्हा चिक्कमगळुरू) आणि कोल्लुरू (जिल्हा उडुपी) येथील मंदिर
धन्यमाणिक राजाला स्वप्नदृष्टांत देऊन माताबरी (त्रिपुरा) येथे स्थानापन्न झालेली श्री त्रिपुरासुंदरीदेवी !