१. राजा सूर्यवर्मन (दुसरा) याने १२ व्या शतकात ‘समराई’ जमातीसाठी भगवान शिवाचे मंदिर बांधण्यास प्रारंभ करणे, नंतर राजा यशोवर्मन (दुसरा) याने या मंदिराचे बांधकाम पूर्ण करणे आणि पुढे त्यास ‘बंते सराई’, असे नाव दिले जाणे

‘खमेर हिंदु साम्राज्याच्या वेळी ‘समराई’ नावाची एक जमात होती. ही जमात कष्टाची कामे करत असे. या जमातीतील लोक मंदिरे, राजवाडा, नगर येथील विविध वास्तू, पूल आदी बांधण्यासाठी लागणारे दगड महेंद्र पर्वताच्या पायथ्याशी जाऊन तेथून आणत. ते भगवान शिवाची उपासना करत.
राजा सूर्यवर्मन (दुसरा) याने १२ व्या शतकात या जमातीसाठी एक सुंदर मंदिर बांधण्यास प्रारंभ केला. नंतर राजा यशोवर्मन (दुसरा) याने या मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. पुढे या मंदिराला ‘बंते सराई’ नाव देण्यात आले. (छायाचित्र क्रमांक १ पहा.) ‘बंते’ म्हणजे किल्ला आणि ‘समराई’ हे जमातीचे नाव. त्यामुळे ‘बंते सराई’ म्हणजे ‘समराई जमातीचा किल्ला’ किंवा ‘समराई जमातीचे मुख्य स्थान’, असे म्हटले जाते.
२. मंदिराच्या भिंतींवर रामायण, महाभारत, तसे इतरही प्रसंगांची अनेक सुंदर शिल्पे कोरलेली असणे





या मंदिराच्या भिंतींवर अनेक सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. यामध्ये प्रामुख्याने राम-रावण युद्ध, असुर आणि वानर यांच्यातील युद्ध (छायाचित्र क्र. २ पहा.), गोवर्धन पर्वत उचलतांना भगवान श्रीकृष्ण, समुद्रमंथनाचे दृश्य, रामायणातील वेगवेगळे देखावे, प्रभु श्रीराम हनुमंताच्या आणि लक्ष्मण अंगदाच्या खांद्यावर बसलेले दृश्य, वालीने ‘मायावी’ नावाच्या राक्षसाचा वध करतानाचा प्रसंग (छायाचित्र क्र. ३ पहा.), इंद्रजिताच्या बाणांनी मूर्च्छित झालेला लक्ष्मण आणि त्याच्यावर उपचार करतांना वैद्य सुशेण, स्वर्गलोकातील दृश्य, तसेच अप्सरा नृत्य करतांनाचे दृश्य, अशा विविध शिल्पांचा समावेश आहे.’
३. शिव-पार्वती मंदिराच्या परिसरात श्रीविष्णु-महालक्ष्मी मंदिर असल्याचे पुरावे असणे, तसेच या मंदिरांच्या भिंती आणि द्वारे यांच्यावर रामायणातील आणि देवतांची अनेक सुंदर शिल्पे कोरलेली असणे
शिव-पार्वती मंदिराच्या परिसरात श्रीविष्णु-महालक्ष्मी मंदिर असल्याचे पुरावे आहेत. हेच या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. सध्या ही दोन्ही मंदिरे भग्नावस्थेत आहेत. या मंदिरांच्या वेगवेगळ्या भिंती आणि द्वारे यांच्यावर अनेक सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. यामध्ये प्रामुख्याने वाली-सुग्रीव युद्ध, हिरण्यकश्यपूचा वध करतांना नृसिंह (छायाचित्रे क्रमांक ३ पहा.), अप्सरा तिलोत्तमा हिला प्राप्त करण्यासाठी एकमेकांशी युद्ध करणारे सुंद-उपसुंद नावाचे असुर, सीतेचे अपहरण करतांना रावण, कैलास पर्वतावर बसलेले भगवान शिव, कैलास पर्वत उचलतांना रावणासुर, खांडववन भक्षण करतांना अग्निदेव आणि त्याला साहाय्य करतांना श्रीकृष्णार्जुन, भगवान शिवावर बाण सोडतांना कामदेव अन् भगवान शिवाने कामदेवाला तिसर्या डोळ्याद्वारे भस्म केल्याचे दृश्य आदी शिल्पांचा समावेश आहे.
४. शिव-पार्वती मंदिरातील वेगवेगळ्या तोरणद्वारांवर सुंदर कोरीव काम असणे, तसेच शिव-पार्वती मंदिर आणि विष्णु-महालक्ष्मी मंदिर या मंदिरांच्या तोरणद्वारांवर अनुक्रमे नंदी अन् गरुड यांची शिल्पे कोरलेली असणे
शिव-पार्वती मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या वेगवेगळ्या दिशांना तोरणद्वार असून त्यांवरही अतिशय सुंदर कोरीव काम केलेले आहे. (छायाचित्रे क्रमांक २ पहा.) त्यांवर कोरलेली शिल्पे ही विश्वात कुठेही नसतील, इतकी ती विशेष आहेत. शिव-पार्वती मंदिर आणि विष्णु-महालक्ष्मी मंदिर या मंदिरांच्या तोरणद्वारांवर अनुक्रमे नंदी अन् गरुड ही शिल्पेही कोरलेली आहेत.’
– श्री. विनायक शानभाग, कंबोडिया
कुलु खोर्यामध्ये अधिष्ठात्री देवता ‘बिजली महादेव’ आणि ‘बेखलीमाता’ (भुवनेश्वरीदेवी) यांचे आहे चैतन्यमय स्थान !
अरेयूरु (कर्नाटक) येथील श्री वैद्यनाथेश्वर शिवाचे दर्शन घेतल्यानंतर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना आलेल्या अनुभूती...
विलोभनीय दर्शन : हिमाचल प्रदेशातील दैवी आणि आध्यात्मिक वैशिष्ट्ये असलेले ‘सूर्यताल’ आणि ‘चंद्रताल’ !
पाण्याची शक्ती आणि सकारात्मकता
गोव्याचा वैभवशाली इतिहास !
युरोपमधील प्रगत संस्कृती आणि साहित्य यांच्यावर भारतीय विज्ञान आणि अध्यात्म यांचा प्रभाव ! – कॅरोलिन...