अणूयुद्धामुळे होणाऱ्या प्रदूषणापासून रक्षण होण्यासाठी करावयाचा उपाय : अग्निहोत्र

Article also available in :

1331532497_agnihotra320

या लेखात आपण अग्निहोत्र करण्याचे महत्त्व, तिसऱ्या महायुद्धाची भीषणता आणि त्यावरील उपाय अन् साधकांसह सामान्यजनांचा जीव वाचवण्यासाठी उपाय, या विषयांवरील माहिती पहाणार आहोत.

१. अग्निहोत्र करण्याचे महत्त्व

त्रिकालज्ञानी संतांनी सांगितलेलेच आहे की, आता पुढे भीषण आपत्काल आहे आणि त्यामध्ये जगभरातील बरीच लोकसंख्या नष्ट होणार आहे. आपत्कालाला सुरुवात झालीच आहे. अनिष्ट शक्तींचा प्रकोप वाढलेल्या कलियुगात आपत्कालात तिसरे महायुद्ध भडकेल. आतंकवादी यंत्रणेपासून संपूर्ण देशाला, समाजाला, परिणामी स्वतःला वाचवायचे असेल, तर अग्नीच्या साहाय्याने ब्रह्मांडमंडलातील त्या त्या देवतांच्या लहरी भूमंडलाकडे आकृष्ट करणार अन् स्त्री, पुरुष, मुले असे कोणीही करू शकणारा अग्निहोत्र.

२. तिसऱ्या महायुद्धाची भीषणता आणि त्यावरील उपाय

तिसऱ्या महायुद्धात अणुबॉम्बच्या किरणोत्सर्गाने प्रदूषण होणार आहे. दुसऱ्या महायुद्धापेक्षा आता जगातील बहुतेक सर्वच राष्ट्रांकडे महासंहारक अशी अण्वस्त्रे आहेत. त्यामुळे ती एकमेकांविरुद्ध डागली जातील. या युद्धामध्ये वाचायचे असेल, तर त्यासाठी अण्वस्त्रे निकामी करणारा, तसेच त्या अण्वस्त्रांपासून निघणारा किरणोत्सर्ग नष्ट करणाराही उपाय हवा. त्याकरिता स्थुलातील उपाय उपयोगी नाहीत; कारण अणुबाँब हा नेहमीच्या बाँबपेक्षा सूक्ष्म आहे. स्थूल (उदा. बाण मारून शत्रूचा नाश करणे), स्थूल अधिक सूक्ष्म (उदा. मंत्र म्हणून बाण मारणे), सूक्ष्मतर (उदा. नुसते मंत्र म्हणणे) आणि सूक्ष्मतम (उदा. संतांचा संकल्प) असे अधिकाधिक प्रभावशाली टप्पे असतात. स्थुलापेक्षा सूक्ष्म हे कित्येक पटीने प्रभावी असते.

अणुबाँबसारख्या प्रभावी संहारकाचा किरणोत्सर्ग थोपवण्यासाठी सूक्ष्मातील काहीतरी करावे लागेल. त्यासाठी ऋषीमुनींनी यज्ञाचा प्रथमावतार असलेले ‘अग्निहोत्र’ हा उपाय सांगितला आहे. करण्यास अतिशय सोपा आणि अतिशय अल्प वेळात होणारा; पण प्रभावी असा सूक्ष्मातील परिणाम साधून देणारा असा उपाय आहे. त्यामुळे वातावरण चैतन्यदायी बनते आणि संरक्षककवचही बनते. अग्निहोत्र हा यज्ञ बंधन्मुक्त असल्यामुळे तो स्त्री, पुरुष, मुले असे कोणीही सहजपणे करू शकतो. अग्निहोत्र करणे हे आकाशमंडलातील सूक्ष्म देवतांच्या तत्त्वांना जागृत करून त्यांच्या लहरी भूमीमंडलावर खेचण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. अग्निहोत्रामुळे वायूमंडलात सिद्ध (तयार) होणारे दिव्य तेजोमंडल हे पारदर्शक काचेच्या तेजोगोलासारखे असून अणुबॉम्बमधील अतिशय सूक्ष्म अशा संहारक किरणांनाही हे वायूमंडल भेदणे अशक्य होते. यामुळे संहारक घटकांपासूनही जिवाचे आणि त्या त्या वायूमंडलाचे रक्षण होऊ शकते.

सामान्यांनी एवढे जरी केले, तरी पुरे आहे. याहूनही प्रभावी, म्हणजे सूक्ष्म उपाय म्हणजे साधना करणे. साधनेने आत्मबल प्राप्त होते आणि आपल्या कार्याला बळ प्राप्त होते. सामान्य व्यक्तीने अग्निहोत्र करण्याने जो लाभ होईल, तो लाभ साधना करणाऱ्या आणि ६० टक्के आध्यात्मिक प्रगती झालेल्या साधकाने नुसत्या प्रार्थनेने साध्य होतो.

पुढे येणाऱ्या आपत्कालात आपला जीव न जावा आणि इतरांचा वाचावा, यांसाठी अग्निहोत्र आणि साधना करा !

३. साधकांसह सामान्यजनांचा जीव वाचवण्यासाठी उपाय

अ. बॉम्बस्फोट म्हणजे ‘भस्मासुर’

या संहारकालात बहुतेकांकडे देवतांची तेजरूपी शक्ती नाही; म्हणून दुर्जन त्या स्तरावर अत्युच्च पातळीच्या अधिकतम स्तरावर विध्वंसक अशी तेजरूपी ऊर्जा बनवणारी स्फोटके सिद्ध करून त्यांचा वापर करण्याचे नियोजन करतात. ही तेजरूपी ऊत्सर्जित होणारी रजतमात्मक ऊर्जा वायूमंडलातील उरल्यासुरल्या सात्विकतेलाही गिळंकृत करते. म्हणूनच बॉम्बस्फोटाला ‘भस्मासुर’ असे म्हटले जाते.

आ. अणूयुद्धामुळे होणाऱ्या प्रदूषणापासून
रक्षण होण्यासाठी करावयाचे उपाय

अणूयुद्धामुळे होणारे प्रदूषण हे वायूमंडलात भयंकर प्रमाणात रज-तमात्मक अशी वादळी प्रक्रिया राबवणारे असल्याने त्या संदर्भात मानवाने आतापासूनच पावले उचलायला हवीत, नाहीतर हे प्रदूषण अनेक मानवी जिवांच्या संहारास कारणीभूत होईल.

इ. श्रीरामाने १४ हजार वर्षे केलेले राज्य आणि
युधिष्ठिराने केलेले दोन राजसूय यज्ञ यांमुळे किरणोत्सर्गाचा
परिणाम नष्ट झाला. आता कलीयुगात आम्हाला काय करता येईल ?

वर उद्धृत केलेल्या ओळी या येणाऱ्या महासंहारक कालाची नांदी दर्शवणाऱ्या असल्या, तरी त्यातून कल्याणाच्या स्तरावर उपायही सांगितलेले असल्याने त्यासाठी मानवाने प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. हे प्रयत्न तेज-निर्मितीचे असतील, तरच रज-तमात्मक अशा बॉम्ब विस्फोटातून ऊत्सर्जित होणाऱ्या भयंकर विनाशकारी तेजाला मानव सामोरा जाऊन त्याच्या देहातील चेतनेचे रक्षण होऊ शकते. ते उपाय म्हणजे अग्निहोत्र आणि साधना करणे.

संदर्भ : सनातन – निर्मित ग्रंथ ‘अग्निहोत्र’

४. वायु प्रदूषणावरील ठोस उपाय – अग्निहोत्र !

अग्निहोत्र करतांना

अग्निहोत्र करतांना

गेल्या काही दिवसांपासून वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीकर हैराण झाले आहेत. प्रदूषणाच्या पातळीने उच्चांक गाठल्याने तेथील आरोग्यमंत्र्यांनी वाहने रस्त्यावर आणण्यासाठी ‘सम-विषम’ संकल्पना पुन्हा लागू करण्याचे ठरवले. ‘सफर इंडिया’ (सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अ‍ॅण्ड वेदर फोरकास्टिंग रिसर्च) या संस्थेने दिलेल्या अहवालानुसार गेल्या ५ वर्षांतील सर्वात जास्त प्रदूषण यंदाच्या वर्षी झाले आहे. तेथील प्रदूषणाने परिसीमा गाठल्यामुळे शाळा बंद ठेवाव्या लागल्या आणि शेवटचा पर्याय म्हणून लोकांनी घराबाहेर पडू नये, अशी सूचनाही देण्यात आली होती. प्रदूषणाची समस्या इतकी गंभीर होईपर्यंत शासनाने वेळेवर उपाययोजना का काढली नाही, हा प्रश्‍नही तितकाच गंभीर आहे. राजधानी देहलीमध्ये प्रदूषण इतके आहे, तसेच ते भारतातील इतर ठिकाणीही आहे.

या घटनेनंतर मुंबई आणि पुणे यांसह अन्य राज्यांतील महत्त्वाच्या शहरांमधील वाढत्या प्रदूषणाविषयी चर्चा होऊ लागली आहे. ‘सफर इंडिया’च्या अहवालानुसार देहली पाठोपाठ प्रदूषित शहर म्हणून पुण्याचा क्रमांक लागला आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असूनही पुण्याने प्रदूषणामध्ये मात्र मुंबईलाही मागे टाकले आहे. पुण्याचे तापमान अल्प झाल्यामुळे येथील प्रदूषण वाढले असल्याचे तज्ञांचे मत आहे. हवेतील वाढत्या प्रदूषकांमुळे सर्दी, खोकला आणि श्‍वसनाचे अनेक विकार यांमुळे पुणेकरही त्रस्त झाले आहेत. त्यातच पुण्यामध्ये दुचाकी वाहनांची संख्याही अधिक असल्याने प्रदूषणात भर पडत आहे. एकेकाळी शुद्ध हवा आणि पाणी यांसाठी ओळखले जाणार्‍या पुण्याची ओळख प्रदूषित शहर म्हणून व्हावी, हे दुर्दैव म्हणावे लागेल.

प्रदूषणाचे नानाविध दुष्परिणाम शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये दिले जातात; मात्र त्यावरील ठोस उपाय आचरला जात नाही. पृथ्वीचे संतुलन बिघडण्यामध्ये प्रदूषण हा महत्त्वाचा घटक आहे; त्याचसमवेत प्रदूषणामुळे मानवी शरीर आणि मन यांचे संतुलन बिघडते. शारीरिक विकारांमुळे मनुष्य निराश होत असल्याने सकारात्मक विचार ग्रहण करण्याची क्षमता अल्प होते. परिणामी अयोग्य विचारांमुळे अयोग्य कृतीही नकळत केली जाते. वेद आणि पुराण यांमध्ये मनुष्याने सकारात्मक राहून आनंदी कसे व्हावे, याची अनेक गुपिते लिहून ठेवलेली आहेत. मनुष्याचे मन सकारत्मक होण्यासाठी त्याच्या आजूबाजूचा परिसरही सकारात्मक, स्वच्छ आणि सुंदर असावा लागतो. परिसर स्वच्छ होण्यासाठी हवा स्वच्छ असावी लागते आणि हवा स्वच्छ होण्यासाठी नियमित अग्निहोत्र करणे, हा उपाय आहे.

अग्निहोत्राचा परिणाम स्वरूप भौतिकरित्या वायूशुद्धता होऊन मानवी मनाची शुद्धी होते. मन शुद्ध असल्यावर आपोआपच त्याचा विचार-आचार यांवर प्रभाव पडून अंतिमत: मनुष्य आनंदी होतो. अग्निहोत्रात वापरल्या जाणार्‍या सामग्रीमुळे हवेतील प्रदूषित घटकांचे प्रमाण अल्प होते, हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये याविषयी अभ्यास होऊन तेथेही प्रदूषणावर उपाय म्हणून अग्निहोत्राचा अवलंब केला जात आहे. यावरून वैदिक परंपरेचे महत्त्व लक्षात येते. वायूशुद्धतेच्या बाह्य उपायांसह साधना म्हणजेच धर्माचरण करणेही तितकेच आवश्यक ठरते. हिंदु संस्कृतीचे महत्त्व जाणून शासन त्यातील अशा काही धार्मिक कृतींना उजाळा देईल, तेव्हा देशाची खर्‍या विकासाकडे वाटचाल चालू होईल.

– कु. ऋतुजा शिंदे, पुणे.