बिहार आणि उत्तरप्रदेश राज्यांतील विविध जिल्ह्यांमध्ये अध्यात्मप्रसाराच्या उद्देशाने सनातन संस्थेकडून ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन

सनातन संस्थेकडून महाशिवरात्रीनिमित्त उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांत विविध ठिकाणी अध्यात्मप्रसारानिमित्त ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले.

महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेकडून देहली शहर, उत्तरप्रदेशातील काही शहरांत, भादरा (राजस्थान) तसेच तेलंगण येथे प्रवचन अन् ग्रंथप्रदर्शन

महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेकडून देहली शहर, उत्तरप्रदेशातील काही शहरांत, भादरा (राजस्थान) तसेच तेलंगण येथे प्रवचन अन् ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते.

सनातन संस्थेच्या आश्रमात परिपूर्ण धर्मशिक्षण दिले जाते ! – कुंभकोणम् (तमिळनाडू) येथील पुरोहित श्री. प्रवीण शर्मा

२५ फेब्रुवारी या दिवशी श्री. प्रवीण शर्मा यांनी सनातनच्या आश्रमात चालणारे विविध राष्ट्र-धर्मविषयक कार्य सनातन संस्थेच्या साधिका सौ. सौम्या कुदरवळ्ळी यांच्याकडून जाणून घेतले

सरोदवादन हे ईश्‍वरप्राप्तीसाठी असून वादन करतांना ‘मी ध्यान करत आहे’, असा भाव ठेवणारे मुंबईतील प्रसिद्ध सरोदवादक श्री. प्रदीप बारोट !

श्री. प्रदीप बारोट यांच्या घराण्यातच संगीत आहे. त्यांचे आजोबा पं. रोडजी बारोट हे प्रसिद्ध सारंगीवादक आणि रतलाम राजघराण्याचे मान्यवर संगीतकार होते.

हंगरहळ्ळी (कर्नाटक) येथील भक्तवत्सल श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीचे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आज होणार चैतन्यमय आगमन !

साधक आणि भक्त यांना भरभरून आशीर्वाद देणारी, भक्तांच्या हाकेला धावून जाणारी श्री विद्याचौडेश्वरीदेवी आणि श्री मठाचे प.पू. श्री श्री श्री बालमंजुनाथ स्वामी यांचे आज (२६ फेब्रुवारीला) रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात चैतन्यमय आगमन होणार आहे.

चेन्नई येथील देवी करूमारी अम्मन मंदिरात शिवरात्री पूजेच्या कार्यक्रमात सनातन संस्थेकडून प्रवचन

चेन्नई (तमिळनाडू) येथील नंगमबक्कम भागातील श्री देवी करूमारी अम्मन मंदिरात सनातन संस्थेच्या साधिका सौ. कल्पना बालाजी यांनी तमिळ नववर्ष, वाढदिवस कसा साजरा करावा ?, शिवरात्रीचे महत्त्व, कुलदेवतेचा आणि दत्ताचा नामजप करण्याविषयीचे महत्त्व, या विषयांवर मार्गदर्शन केले.

कोची : ‘अमृता स्कूल ऑफ आर्टस् अँड सायन्स’ येथील पुस्तक मेळ्यात सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन

१४ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत येथील माता अमृतानंदयी यांनी स्थापन केलेल्या ‘अमृता स्कूल ऑफ आर्टस् अँड सायन्स’ येथे ‘समग्र – नॅशनल सेमिनार ऑन इंडियन लिटरेचर अँड कल्चर’ हा कार्यक्रम आयोजित मेळ्यात सनातन संस्थेने ग्रंथप्रदर्शन कक्ष लावले होते.

सनातन संस्थेच्या वतीने चेन्नई येथे सत्संग सोहळा

सनातन संस्थेच्या वतीने चेन्नई (तमिळनाडू) येथील अरूम्बक्कम भागातील पेरूमल स्कूल या ठिकाणी ९ फेब्रुवारी या दिवशी विशेष सत्संग सोहळा पार पडला.

चेन्नई येथील ‘हिंदू आध्यात्मिक सेवा मेळा २०२०’मध्ये सनातन संस्थेचा सहभाग

चेन्नई (तमिळनाडू) येथील वेलाचेरी भागातील गुरुनानक महाविद्यालयामध्ये ११ वा हिंदू आध्यात्मिक सेवा मेळा २०२० पार पडला. या वेळी सनातन संस्थेकडून कक्ष लावण्यात आले होते.

ब्रह्मपूर येथील शिव मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आले ग्रंथ आणि फ्लेक्स प्रदर्शन

सनातन संस्थेच्या वतीने जळगाव शहरातील ओंकारेश्वर महादेव मंदिर, एस्.टी. वर्कशॉप येथील महादेव मंदिर, शिवधाम निमखेडी, भुसावळ येथील रानातील महादेव मंदिर, नर्मदेश्वर महादेव मंदिर, चोपडा येथील हरेश्वर मंदिर, जामनेर येथील सोनबर्डी महादेव मंदिर, पाचोरा आणि ब्रह्मपूर येथील महादेव मंदिर येथे ग्रंथ आणि फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते.