सनातनची युवा साधिका कु. निधी शंभू गवारे हिचा ‘कलोत्सव २०२१’ यामध्ये सादर केलेल्या नृत्य प्रकारात प्रथम क्रमांक !

‘नेस्पा’ आणि ‘माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय माजी विद्यार्थी संघटना’ यांनी ‘ऑनलाईन’ आयोजित केलेल्या ‘कलोत्सव २०२१’ मध्ये सनातनची युवा साधिका कु. निधी गवारे हिने नृत्य प्रकारात सहभाग घेतला होता.

हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना आवाहन !

हिंदु जनजागृती समितीने सर्व हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मासाठी कार्य करणार्‍या संघटनांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारे फेसबूकने कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता त्यांच्या पानांवर बंदी आणली असेल, तर याची माहिती हिंदु जनजागृती समितीला कळवा.

सनातन संस्थेचे साधक आणि उपकार्यकारी अभियंता श्री. नीलेश नागरे यांना ‘राज्यस्तरीय कोविड योद्धा समाजरक्षक’ महासन्मान !

अखिल महाराष्ट्र पत्रकार आणि पत्रलेखक संघ अन् विश्‍वात्मक मराठी साहित्य परिषद यांच्या वतीने सनातन संस्थेचे साधक आणि उपकार्यकारी अभियंता श्री. नीलेश नागरे यांना ‘राज्यस्तरीय कोविड योद्धा समाजरक्षक महासन्मान २०२१’ने सन्मानित करण्यात आले. नाशिक झोनमध्ये नगर मंडळ कार्यालयांतर्गत श्रीरामपूर विभागात उपकार्यकारी अभियंता म्हणून श्री. नीलेश नागरे कार्यरत आहेत.

भीषण काळात जिवंत रहाण्यासाठी ईश्वरी कृपा असणे आवश्यक ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

ईश्वर भक्त आणि साधना करणारे यांच्यावर कृपा करतो. गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितले आहे, ‘न मे भक्त: प्रणश्यति ।’ म्हणजे माझ्या भक्तांचा नाश होत नाही. ईश्वराची कृपा मिळवायची असेल, तर धर्मशिक्षण घेऊन साधना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले.

आपत्काळात पेट्रोल, डिझेल आदी इंधनांचा तुटवडा भासण्याची शक्यता असल्याने सायकलचा पर्याय निवडा !

‘सायकल’ हे इंधनाविना चालणारे वाहतुकीचे एक उत्तम साधन आहे. सायकल चालवल्याने व्यायाम होत असल्याने ती चालवणे, हे वैयक्तिक आरोग्यासाठीही लाभदायी आहे. अन्य वाहनांमुळे वायू, तसेच ध्वनी प्रदूषण होते; पण सायकल चालवल्याने कोणतेही प्रदूषण होत नाही. त्यामुळे सायकल पर्यावरणपूरक आहे.

फेसबूककडून आता हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदी’ पानही बंद !

फेसबूककडून हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदु अधिवेशन’, तसेच ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे ‘सनातन प्रभात’ आणि सनातनचे ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादनांची विक्री करणारे ‘सनातन शॉप’ ही फेसबूक पाने बंद करण्यात आल्यानंतर या संदर्भात हिंदु जनजागृती समिती, सनातन प्रभात आणि सनातन संस्था यांच्याकडून पत्रे पाठवण्यात आली आहेत; मात्र याविषयी फेसबूककडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.

युवकांनो, स्वातंत्र्यापूर्वीच्या क्रांतिकार्यातील युवकांचा आदर्श घ्या !

भारताला स्वतंत्र करण्यासाठी ज्या राष्ट्रप्रेमाने युवक भारित झाले होते, तशाच तळमळीने आणि प्रेरणेने युवक राष्ट्रहितासाठी सर्वस्व झोकून देऊन प्रयत्न केले, तर भारत पुनश्‍च वैभवाच्या शिखरावर जाण्यास वेळ लागणार नाही ! यासाठी स्वातंत्र्यपूर्वकाळातील देशकार्याला वाहून घेतलेल्या युवकांची गुणवैशिष्ट्ये जाणून घेणे आवश्यक आहे !

पुणे येथील सनातनच्या ६७ व्या संत पू. (श्रीमती) प्रभा व्यंकटेश मराठेआजी (वय ८४ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

सनातनच्या ६७ व्या संत पू. (श्रीमती) प्रभा व्यंकटेश मराठेआजी (वय ८४ वर्षे) यांचा रविवार, वैशाख कृष्ण पक्ष एकादशी (६ जून २०२१) या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांचा साधनाप्रवास त्यांच्याच शब्दात येथे पाहूया !

प्रारब्ध

भक्त, संत आणि ईश्वर, अध्यात्म आणि अध्यात्मशास्त्र, चार पुरुषार्थ अशा विविध विषयांवर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून पू. अनंत आठवले यांनी सोप्या भाषेत उलगडलेले ज्ञान येथे देत आहोत. यातून वाचकांना अध्यात्मातील तात्त्विक विषयाचे ज्ञान होऊन त्यांच्या शंकांचे निरसन होईल आणि ते साधना करण्यास प्रवृत्त होतील.

कर्नाटकमधील कोडी मठाचे श्री शिवानंद शिवयोगी राजेंद्र श्री यांची भविष्यवाणी !

कोरोनाचे संकट अजून १० वर्षे रहाणार आहे. २० जून या दिवशी कोरोनाची दुसरील लाट अल्प होणार आहे; मात्र नंतर तिसरी लाट येणार आहे. ती भयानक असणार आहे. लोक कोट्यवधी लोक रस्त्यावर रक्ताच्या उलट्या करून मरतील.